Asur 2 Webseries : 'असुर 2' नंतर काय असणार कल्कि अवतार? खुद्द धनंजय राजपूतनेच दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 04:44 PM2023-06-13T16:44:40+5:302023-06-13T16:45:58+5:30

'असुर'चा दुसरा पार्ट बघितल्यानंतर तिसऱ्या भागाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

asur 2 webseries now what will be in part 3 arshd warsi revealed | Asur 2 Webseries : 'असुर 2' नंतर काय असणार कल्कि अवतार? खुद्द धनंजय राजपूतनेच दिलं उत्तर

Asur 2 Webseries : 'असुर 2' नंतर काय असणार कल्कि अवतार? खुद्द धनंजय राजपूतनेच दिलं उत्तर

googlenewsNext

सध्या वेबसीरीजची चलती आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'असुर 2' (Asur 2) चं प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. पहिल्या भागाच्या यशानंतर दुसरा भागही तेवढाच लोकप्रिय ठरला आहे. कल्कीचा वध करण्याचा आणि कलियुगाला शिखरावर नेण्याचा असुरचा डाव होता जो उधळून लावण्यात आलाय. तर आता चाहते तिसऱ्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

'असुर'चा दुसरा पार्ट बघितल्यानंतर तिसऱ्या भागाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तसंच तिसऱ्या भागात काय घडणार याचा आपापल्या परीने अंदाजही चाहत्यांनी लावलाय. आता यावर धनंजय राजपूत म्हणजेच स्वत: अर्शद वारसीने (Arshad Warsi) प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'प्रेक्षकांच्या नजरेतून पाहिलं तर असुरचा तिसरा पार्ट आला पाहिजे. कारण दुसऱ्या भागात असे अनेक सिक्रेट्स आहेत जे अद्याप उलगडले नाहीयेत. तसंच दुसऱ्या पार्टमध्ये प्रेक्षकांना हिंट मिळालीच आहे की पुढचा असुर कोण असणार आहे. साहजिकच आहे ते उत्सुक असणार.'

तो पुढे म्हणाला, 'जेव्हा सिझन १ ची आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा आम्ही दुसऱ्या भागाचा विचारही केला नव्हता. मात्र सिझन २ च्या वेळेसच मी शोचा लेखक गौरवला सांगितले की तिसरा भाग लिहायला आतापासूनच सुरुवात कर. मला आशा आहे त्याने माझं बोलणं गांभीर्याने घेतलं असेल. कथा लिहिणं सोप्पं नाही. यासाठी खूप रिसर्च करावं लागतं. मलाही तिसरा सिझन बघायचा आहे. मला शेवट बघायचा. लोकांना नेमकं कोण मारतंय हे मला जाणून घ्यायचं आहे.'

'असुर 2' जिओ सिनेमावर रिलीज करण्यात आली आहे. ही एक मिस्ट्री, मायथॉलॉजिकल आणि क्राईम-थ्रिलर सीरीज आहे.याचा पहिला भाग व्हूट वर रिलीज करण्यात आला होता. 

Web Title: asur 2 webseries now what will be in part 3 arshd warsi revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.