'माझं हसू एडीट केलं जातं' ; हसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर अर्चना पूरण सिंहचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 01:32 PM2024-03-30T13:32:56+5:302024-03-30T13:33:44+5:30

Archana puran singh: अर्चना पूरण सिंहने कपिल शर्मा शोविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

archana-puran-singh-reveals-story-behind-her-fake-laughs-the-great-indian-kapil-show | 'माझं हसू एडीट केलं जातं' ; हसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर अर्चना पूरण सिंहचा खुलासा

'माझं हसू एडीट केलं जातं' ; हसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर अर्चना पूरण सिंहचा खुलासा

प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा सध्या त्याच्या द ग्रेट इंडियन कपिल शो (The Great Indian Kapil Show) या कार्यक्रमामुळे चर्चेत येत आहे.  लवकरच त्याचा हा शो नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे या शो विषयी अनेक अपडेट समोर येत आहेत. यामध्येच आता प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांनी शो विषयी एक मोठा खुलासा केला आहे. या शोमध्ये तिला जोक्सवर खरोखर हसू येतं की, केवळ नायलाजास्तोवर ती हसते हे तिने सांगितलं आहे.

 अलिकडेच अर्चना पूरण सिंह, कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अर्चनाने तिच्या हसण्याविषयी भाष्य केलं आहे. अर्चना पूरण सिंह बऱ्याचदा शोमधील तिच्या हसण्याच्या स्टाइलवरुन ट्रोल होत असते. मात्र, मी पांचट जोक्सवर हसत नाही, असं म्हणत तिने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे.

"मागच्या तीन वर्षांपासून तुम्ही आम्हाला बघताय आता आम्ही नेटफ्लिक्सवर येतोय. लोकांना असं वाटायचं की आम्ही फुटकळ जोक्सवरही हसतो. पण, शोच्या मेकर्सला असं वाटतं की कोणत्याही जोकमध्ये पंच नसेल तर अर्चनाच्या हसण्यामुळे तो जोक चर्चेत येईल. त्यामुळे ते दरवेळी माझ्या हास्याचा सीन एडिट करुन पंच नसलेल्या जोकला जोडायचे. पण, या सगळ्यात काय झालं तो जोक तर काही लोकप्रिय झाला नाही. मात्र, मला नाहक ट्रोल व्हावं लागलं. लोकांना वाटू लागलं ही ती मुर्खच आहे, कोणत्याही जोकवर हसते", असं अर्चनाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, "हसत हसत राहणं हा जगातला सगळ्यात चांगला जॉब आहे. कारण इथे हसायचे पैसे मिळतात. आधी माझ्या हास्याचे सीन एडीट केले जायचे. पण, आता ते करणं मेकर्सने थांबवलं आहे."

दरम्यान, अर्चना पूरण सिंह या कार्यक्रमात परिक्षकांची भूमिका वठवतांना दिसून येते. यापूर्वी तिच्या जागी नवज्योत सिंह सिद्धू परिक्षकाच्या पदावर होते.

Web Title: archana-puran-singh-reveals-story-behind-her-fake-laughs-the-great-indian-kapil-show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.