सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:50 IST2025-05-04T13:49:08+5:302025-05-04T13:50:03+5:30
अभिनेत्रीने सांगितला तो प्रसंग

सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
ओटीटीवर सर्वात गाजलेली आणि चर्चेतली वेबसीरिज म्हणजे 'आश्रम'. बॉबी देओल सीरिजमध्ये बाबा निरालाच्या भूमिकेत दिसला तर अभिनेत्री अदिती पोहनकर पम्मी पहलवानच्या भूमिकेत झळकली. या सीरिजने बॉबीचं करिअर पुन्हा उभं केलं तर अदितीला मोठी संधी मिळाली. सीरिजमध्ये अदितीने २६ वर्ष मोठ्या बॉबीसोबत इंटिमेट सीन्सही दिले आहेत. 'आश्रम'चे तीन सीझन आले आहेत. तिसर्या सीझनच्या शूटिंगवेळीच अदितीच्या वडिलांचं निधन झालं होतं. अदितीने नुकतीच ही आठवण एका मुलाखतीत शेअर केली.
'झूम'शी बोलताना अदिती म्हणाली, "जेव्हा मी आश्रम ३ च्या शूटमध्ये व्यग्र होते तेव्हाच माझ्या वडिलांचं निधन झालं. माझ्यासाठी तो खूप कठीण प्रसंग होता. पडद्यावर अभिनय करताना एक शॉट देऊन आपण लगेच पुढे जातो. पण खऱ्या आयुष्यात तसं होत नाही. हेच मी या घटनेतून शिकले."
ती पुढे म्हणाली, "आश्रम सीरिज माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझ्या वडिलांनीच मला याचं शूट करत राहण्याचा सल्ला दिला होता. माझ्यासाठी परत आलीस तर मला वाईट वाटेल असं ते मला म्हणाले होते. मी तेच केलं जे मला वडिलांनी सांगितलं. यामुळे मी एक स्ट्राँग व्यक्ती बनले. कारण भावनिकरित्या मी कमकुवत होते आणि माझे वडील मजबूत होते. त्यांना माहित होतं की त्यांच्याकडे आता फारसे दिवस राहिले नाहीत आणि ते मला हे सांगत आहेत कल्पना करा काय वाटलं असेल."
अदितीने 'लय भारी' या मराठी सिनेमात काम केलं होतं. तिची she ही सीरिजही खूप गाजली. इम्तियाज अलीने याची निर्मिती केली होती. यासोबतच तिला 'आश्रम' मुळे ओळख मिळाली. अदितीने दोन्ही सीरिजमध्ये इंटिमेट सीन्स दिले आहेत ज्यामुळे तिची कायम चर्चा होते.