'फुलेरा' गावाला मिळणार नवा सचिव? 'पंचायत 3' मध्ये मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 10:48 IST2024-03-27T10:47:36+5:302024-03-27T10:48:04+5:30

अभिनेता जितेंद्र कुमारने सीरिजमध्ये 'फुलेरा' गावाच्या सचिवाची अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली जी अत्यंत लोकप्रिय झाली. शिवाय प्रधान, सरपंच, गावातील इतर लोक सर्वांनीच अफलातून काम केलं.

Abhishek Tripathi will not be seen as secretary of Phulera Village in Panchayat 3 webseries | 'फुलेरा' गावाला मिळणार नवा सचिव? 'पंचायत 3' मध्ये मोठा ट्विस्ट

'फुलेरा' गावाला मिळणार नवा सचिव? 'पंचायत 3' मध्ये मोठा ट्विस्ट

ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय वेबसीरिज 'पंचायत' च्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अमेझॉनने काही दिवसांपूर्वीच आगामी ७० शोजची घोषणा केली. यामध्ये पंचायत 3 चीही झलक दाखवण्यात आली. अभिनेता जितेंद्र कुमारने सीरिजमध्ये 'फुलेरा' गावाच्या सचिवाची अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली जी अत्यंत लोकप्रिय झाली. शिवाय प्रधान, सरपंच, गावातील इतर लोक सर्वांनीच अफलातून काम केलं. पण आता तिसऱ्या भागात अभिषेक त्रिपाठी सचिव नसणार? अशी चर्चा आहे.

'पंचायत' ची कथा ही 'फुलेरा' गावाची आहे. गावाचे लाडके सचीव अभिषेक त्रिपाठी यांची बदली होणार असल्याचं दुसऱ्या भागाच्या शेवटी दाखवण्यात आलं होतं. भागातील आमदारासोबत प्रधान, सचिव यांचं भांडण होतं. त्यात आमदार सचिवजींच्या बदलीचे आदेश देतो इथेच शेवट झाला होता. पण मग आता तिसऱ्या सिझनमध्ये फुलेरा गावाला नवीन सचिव मिळणार असल्याची चर्चा आहे. अमेझॉनच्या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्यांना तिसऱ्या सीझनची खास झलक पाहायला मिळाली. यामध्ये मोठ्या ट्विस्टची हिंट दिसली. 

'पंचायत'मधील 'गजब बेइज्जती है' हा डायलॉग खूप गाजला. यावर आजही अनेक मीम्स बनतात. पहिल्या सिझनमध्ये फुलेरा गावातील एका मुलीशी लग्न करणारा गणेशच्या फोटोवर हा डायलॉग खूप गाजतो. वरात घेऊन आलेल्या गणेश आणि सचिवमध्ये वाद होतात. आता हाच गणेश म्हणजेच अभिनेता आसिफ खान फुलेरा गावचा नवा सचिव बनून परत येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर अभिषेक त्रिपाठी अन्य गावाचा सचिव झाल्याचं दाखवण्यात येणार आहे. आता हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं नाही मात्र पंचायत 3 ची कहाणी आणखी मजेशीर असणार आहे. पंचायत 3 ची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र येत्या दोन महिन्यात शो रिलीज करणार असल्याचं मेकर्सने सांगितलं आहे.

Web Title: Abhishek Tripathi will not be seen as secretary of Phulera Village in Panchayat 3 webseries