Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 19:40 IST2025-05-01T19:40:15+5:302025-05-01T19:40:50+5:30

आज दिवसभरात Waves summit 2025 काय घडलं? याचा आढावा घ्या एका क्लिकवर. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली

Waves summit 2025 updates pm modi commemorative 5 legendary celebrities postal stamps | Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण

Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण

आज मुंबईत Waves summit 2025 चा शानदार सोहळा पार पडला. या सोहळ्याचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली. Waves summit 2025 सोहळ्यात शाहरुख खान, अक्षय कुमार, आमिर खानपासून हिमेश रेशमिया, श्रेया घोषाल यांसारखे दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. जाणून घ्या दिवसभरात Waves summit 2025 घडलेल्या महत्वाच्या घडामोडी

  • पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीटाचं अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज सेलिब्रिटींच्या नावाने टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं. गुरुदत्त, राज खोसला, पी. भानुमति, सलिल चौधरी आणि ऋत्विक घटक या पाच दिग्गज मान्यवरांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात आलं. या पाच दिग्गजांची ओळख सांगायची तर गुरुदत्त हे महान अभिनेते आणि दिग्दर्शक होते. सलील चौधरी हे गीतकार, लेखक आणि कवी होते. ऋत्विक घटक हे निर्माता, पटकथा लेखक होते. राज खोसला हे हिंदी सिनेसृष्टीचं रुप बदलणारे महान फिल्ममेकर होते. पी. भानुमती या अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार होत्या. 

Image

 

  • पंतप्रधान मोदींंचं खास भाषण
    मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे Waves summit 2025 पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व कलाकारांसमोर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारतीय चित्रसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचं स्मरण केलं. मोदी म्हणाले की, "भारतीय सिनेमांच्या कथांनी किती मोठा प्रवास केला आहे. राज कपूर यांना रशियामध्ये मिळालेली प्रसिद्धी, सत्यजित रे यांचा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणारा सन्मान ते अलीकडेच RRR सिनेमाला ऑस्कर सोहळ्यात मिळालेलं यश. भारतीय सिनेमाने संस्कृतीच्या कक्षा विस्तारल्या आहेत", अशाप्रकारे पंतप्रधान मोदींनी इतक्या वर्षांचा सिनेप्रवास उलगडला. 


     

बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी
Waves summit 2025 मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी दिसली. या सोहळ्यात शाहरुख खान, रणबीर कपूर, विकी कौशल, सैफ अली खान, ए. आर. रहमान, श्रीलीला, मोहनलाल, रजनीकांत, अक्षय कुमार, हिमेश रेशमिया, हेमा मालिनी, चिरंजीवी या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. मोहनलाल यांनी Waves summit 2025 चा आनंद दर्शवणारी पोस्ट सर्वांसोबत शेअर केली. या फोटोत ते इतर कलाकारांसोबत गप्पा मारताना दिसले.
Image

  • शाहरुख खानने सांगितले महत्वाचे विचार
    Waves summit 2025 मध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांनी करण जोहरसोबत संवाद साधला. The Journey: From Outsider to Ruler moderated या सेशनमध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण सहभागी झाले होते. यावेळी शाहरुखने उपस्थित तरुणांसमोर एक आदर्श विचार मांडला. तो म्हणजे, शाहरुख म्हणाला की, "जर तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद असेल तर तुम्हाला कधीच एकटं वाटणार नाही. जर तुम्हाला मुलं नसतील तर तुमच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर दिसणार आनंद तुमचा एकटेपणा दूर करेल", असा महत्वाचा विचार शाहरुखने मांडला.


 

Web Title: Waves summit 2025 updates pm modi commemorative 5 legendary celebrities postal stamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.