‘महिलाकेंद्रित चित्रपटात काम करायला आवडेल’
By Admin | Updated: June 2, 2017 04:37 IST2017-06-02T04:37:37+5:302017-06-02T04:37:37+5:30
नाटक, टीव्ही, चित्रपट असा यशस्वी प्रवास करणारी गुणी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने लोकमत सीएनएक्स मस्तीसोबत बोलताना म्हटले

‘महिलाकेंद्रित चित्रपटात काम करायला आवडेल’
नाटक, टीव्ही, चित्रपट असा यशस्वी प्रवास करणारी गुणी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने लोकमत सीएनएक्स मस्तीसोबत बोलताना म्हटले की, ‘आम्ही कलाकार नेहमीच आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात असतो. त्यातल्या त्यात मी तर खूपच योग्य भूमिकांची निवड करत असते. मला महिलाकेंद्रित विषयांवर आधारित चित्रपटांत काम करायला आवडेल. एकतर ग्रामीण भागात आजही स्त्रीभ्रूणहत्या खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. ‘मुलगाच हवा’ असा हट्ट त्या पालकांचा असतो. त्यामुळे मुलींच्या जन्माचा घटता दर खूप चिंतेची बाब आहे. दुसरे म्हणजे शहरांत मुलींवर होणारे बलात्कार, अन्याय, अत्याचार, छेडछाड यांच्यावर आधारित एखाद्या चित्रपटात काम करून समस्येला वाचा फोडता येईल. असा प्रोजेक्ट जर येत्या काळात मला मिळाला तर मी नक्कीच तो करेन.