अंकुश दिग्दर्शित आगामी चित्रपटाची प्रतीक्षा
By Admin | Updated: February 6, 2016 02:40 IST2016-02-06T02:40:13+5:302016-02-06T02:40:13+5:30
तरुणांचा स्टाईल आयकॉन बनलेला अंकुश चौधरी चांगला दिग्दर्शकही आहे. ‘साडे माडे तीन’ आणि ‘झकास’ या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले आहे.

अंकुश दिग्दर्शित आगामी चित्रपटाची प्रतीक्षा
तरुणांचा स्टाईल आयकॉन बनलेला अंकुश चौधरी चांगला दिग्दर्शकही आहे. ‘साडे माडे तीन’ आणि ‘झकास’ या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने केले आहे. मात्र, सध्या अभिनयात व्यस्त असलेल्या अंकुशला गेल्या चार वर्षांपासून दिग्दर्शनासाठी फुरसत मिळत नाही. त्याच्या दिग्दर्शनाची केवळ प्रेक्षकच नाही, तर त्याचे कलाकारही वाट पाहत आहेत.
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झकास’ चित्रपटामध्ये सई ताम्हणकर, पूजा सावंत व अमृता खानविलकर या तीन
अभिनेत्री होत्या. त्यामुळे ‘दगडी चाळ’मध्ये त्याच्याबरोबर कलरफुल रोल केलेल्या पूजाला आता पुन्हा त्याच्या डायरेक्शनची प्रतीक्षा आहे. ती म्हणते, ‘‘दिग्दर्शकाकडे हवी ती दृष्टी त्याच्याकडे आहे. ‘झकास’मध्ये काम करताना आम्हा तिन्ही कलाकारांना त्यांनी कुठल्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही. कलाकारांबरोबरच त्याचे सेटवर उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडे जातीने लक्ष असते. प्रॉडक्शनमध्येही तो लक्ष घालतो. त्यामुळे त्याच्या चित्रपटात काम करणे एक आनंददायी अनुभव असतो.’’ पूजासारखीच त्याच्या चाहत्यांनाही प्रतीक्षा आहे. पण सध्या अभिनयाच्या बाबतीत फॉर्ममध्ये असल्याने त्याला वेळ मिळणे महत्त्वाचे आहे.