‘पिंडदान’ टीमची ‘लोकमत’ला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 01:43 IST2016-06-17T01:43:35+5:302016-06-17T01:43:35+5:30

‘सारथी एंटरटेन्मेंट’च्या पूनम शेंडे प्रस्तुत ‘पिंडदान’ या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली. या वेळी चित्रपटाच्या अनेक गोष्टी पिंडदान या चित्रपटाच्या टीमने

Visit to 'Pinddaan' team 'Lokmat' | ‘पिंडदान’ टीमची ‘लोकमत’ला भेट

‘पिंडदान’ टीमची ‘लोकमत’ला भेट

‘सारथी एंटरटेन्मेंट’च्या पूनम शेंडे प्रस्तुत ‘पिंडदान’ या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली. या वेळी चित्रपटाच्या अनेक गोष्टी पिंडदान या चित्रपटाच्या टीमने ‘लोकमत’सोबत शेअर केल्या आहेत. तसेच विदेशी अभिनेत्रीनेदेखील आपला मराठी बाणा दाखवत या भेटीला चार चाँद लावले. या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक प्रशांत पाटील म्हणाले, की या चित्रपटाच्या नावावरून हा काहीसा पारंपरिक चित्रपट असेल हा समज आहे. तो चुकीचा आहे. कारण पिंडदान या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट नसून या प्रथेविषयीच्या भावभावनांनादेखील टच करण्यात आला नाही. ही एक पिंडदान या विषयाच्या अवतीभोवती फिरणारी रहस्यमय कथा आहे. अविनाश घोडके यांनी ही कथा लिहिली आहे. ‘‘दोन वेगवेगळे जग, संस्कृती हे एकमेकांना कसे भेटतात, ते या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि एक रहस्यमय प्रेमकहाणीचा ट्रँगल तुम्हाला अनुभवता येणार आहे. तसेच या चित्रपटातील गाणीदेखील खूप छान आहेत, ’’ असे अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने सांगितले.

Web Title: Visit to 'Pinddaan' team 'Lokmat'