अनुष्काला भेटायला सेटवर पोहोचला विराट, शाहरूखने केला पाहुणचार

By Admin | Updated: September 18, 2016 17:08 IST2016-09-18T16:09:23+5:302016-09-18T17:08:36+5:30

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला भेटायला चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'द रिंग' या चित्रपटाच्या

Virat, Shah Rukh Khan took hostage set to meet Anushka | अनुष्काला भेटायला सेटवर पोहोचला विराट, शाहरूखने केला पाहुणचार

अनुष्काला भेटायला सेटवर पोहोचला विराट, शाहरूखने केला पाहुणचार

ऑनलाइन लोकमत

मुंबई,दि.18- टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू  विराट कोहली त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला भेटायला चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. दिग्दर्शक  इम्तियाज अली यांच्या  'द रिंग'  या चित्रपटाच्या शुटींगमध्ये सध्या अऩुष्का आणि शाहरूख खान बिझी आहेत. अनुष्काच्या बिझी वेळापत्रकामुळेच विराट तिला भेटायला थेट सेटवर पोहोचला.

यावेळी खुद्द बॉलीवुड किंग शाहरूख खानने विराट कोहलीचा पाहुणचार केल्याचं वृत्त आहे. तसेच विराटच्या पाहुणचारामध्ये कोणतीच कमी राहता कामा नये असं चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमला सुद्धा बजावण्यात आलं होतं.  
 
शाहरूखने केलेल्या पाहुणचाराने विराट आणि अनुष्का दोघं भलतेच आनंदी झाले. यावेळी शाहरूख खान आणि विराट कोहलीने एकत्र बराच वेळ गप्पा देखील मारल्या. 

Web Title: Virat, Shah Rukh Khan took hostage set to meet Anushka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.