नागराज मंजुळेचा फोटो होतोय व्हायरल, नवीन लूक पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 12:31 IST2021-10-20T12:28:32+5:302021-10-20T12:31:42+5:30

पुन्हा एकदा नागराज मंजुळे नवीन सिनेमासह रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सिनेमात आकाश ठोसरही असणार आहे.

Viral Pics: The Internet Cannot Get Over Nagraj Manjule's Transformation | नागराज मंजुळेचा फोटो होतोय व्हायरल, नवीन लूक पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

नागराज मंजुळेचा फोटो होतोय व्हायरल, नवीन लूक पाहून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे 'सैराट'. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं होतं. सैराटसह नागराजच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंती दिली. एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराजची ओळख बनलीय.नागराज मंजुळेचे आज जगभरात चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे नागराज मंजुळेशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांनाही तितकाच रस असतो. 

नागराज मंजुळेचा नवीन लूक असलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. फोटोपाहून चाहते काहीसे आश्चर्यचकीत होत आहेत. कारण नागराज मंजुळेने त्यांच्या लूकवरही चांगलीच मेहनत घेत नवीन लूक मिळवला आहे. नागरजा मंजुळेचा हा नवीन लूकही चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पात्र ठरला आहे. फोटो पाहून चाहते लूकवर कमेंट आणि लाईक्स देत पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुन्हा एकदा नागराज मंजुळे नवीन सिनेमासह रसिकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे सिनेमात आकाश ठोसरही असणार आहे. 'घर बंदूक बिरयानी' असे या आगामी सिनेमाचे नाव आहे. खुद्द नागराज मंजुळेनेच सिनेमाचा पहिला टीजर सोशल मीडिवार शेअर केला आहे. सिनेमात नागराज मंजुळे, आकाश ठोसरसह सयाजी शिंदे यांचीही मुख्य भूमिका असणार आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. सिनेमाची घोषणा झाल्यानंतर रसिकांमध्येही वेगळीच उत्सुकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करत चाहते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

Web Title: Viral Pics: The Internet Cannot Get Over Nagraj Manjule's Transformation