नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाले होते विंदू दारा सिंगचे लग्न, काहीच वर्षांत झाला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 11:06 IST2020-05-06T11:05:50+5:302020-05-06T11:06:49+5:30

विंदूने नव्वदीच्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला. या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

vindu dara singh was married to famous actress farah naaz PSC | नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाले होते विंदू दारा सिंगचे लग्न, काहीच वर्षांत झाला घटस्फोट

नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाले होते विंदू दारा सिंगचे लग्न, काहीच वर्षांत झाला घटस्फोट

ठळक मुद्देविंदूचे पहिले लग्न अभिनेत्री फराह नाझ सोबत झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. फराह ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने गोविंदासोबत तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.

विंदू दारा सिंगचा आज वाढदिवस असून तो ज्येष्ठ अभिनेते दारा सिंग यांचा मुलगा आहे. विंदूने बिग बॉस या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवले असून त्याने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला म्हणावे तसे अभिनयक्षेत्रात यश  मिळाले नाही. विंदू त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा कॉन्ट्रोव्हर्सींमुळे जास्त चर्चेत असतो. विंदूचे आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये नाव आले होते. तसेच एका सेक्स रॅकेट संदर्भात देखील त्याचे नाव गाजले होते. तुम्हाला माहीत आहे का, विंदूने नव्वदीच्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न केले होते. पण काहीच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.

विंदूचे पहिले लग्न अभिनेत्री फराह नाझ सोबत झाले होते. पण काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. फराह ही नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने गोविंदासोबत तर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ती अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. फराह गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. विंदू दारा सिंग आणि फराह यांची ओळख नव्वदीच्या दशकात एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. विंदू आणि फराह काहीच महिन्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. पण त्यांच्या दोघांच्याही घरातील मंडळी या नात्याच्या विरोधात होते. फराहने एखाद्या सेटल व्यक्तीशी लग्न करावे असे तिच्या घरातील लोकांना वाटत होते तर घर सांभाळणाऱ्या मुलीसोबत विंदूने लग्न करावे अशी दारा सिंग यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी ब्रेकअप केले.

त्याचदरम्यान विंदू त्याच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तामीळनाडूला गेला होता. त्यामुळे त्या दोघांचा एकमेकांशी काहीही संपर्क नव्हता. पण या दुराव्यामुळेच आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे त्या दोघांना जाणवले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबियांनी देखील लग्नासाठी परवानगी दिली. त्यांना लग्नानंतर एकच वर्षांत मुलगा झाला. सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि २००२ मध्ये फराह मुलाला घेऊन दुसरीकडे राहायला लागली आणि त्यांनी घटस्फोट घेतला.

Web Title: vindu dara singh was married to famous actress farah naaz PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.