विक्रम गोखलेंची रंगभूमीवरून एक्झिट..

By Admin | Updated: March 4, 2016 01:06 IST2016-03-04T01:06:24+5:302016-03-04T01:06:24+5:30

खरा कलाकार हा रंगभूमीवरच घडतो, असे म्हणतात. रंगभूमीवर काम केल्यानंतर मोठ्या पडद्यावर येणारे अनेक सशक्त कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या दर्जेदार अभिनयाने रंगभूमीच नाही, तर मोठा पडदादेखील गाजविला आहे

Vikrama Gokhale's exit from theater .. | विक्रम गोखलेंची रंगभूमीवरून एक्झिट..

विक्रम गोखलेंची रंगभूमीवरून एक्झिट..

खरा कलाकार हा रंगभूमीवरच घडतो, असे म्हणतात. रंगभूमीवर काम केल्यानंतर मोठ्या पडद्यावर येणारे अनेक सशक्त कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या दर्जेदार अभिनयाने रंगभूमीच नाही, तर मोठा पडदादेखील गाजविला आहे. विक्रम गोखले हे त्यातलेच एक कलाकार आहेत. त्यांनी त्यांच्या दर्जेदार अभिनयाने रंगभूमी गाजविली आहे. परंतु, आता त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेत असल्याचे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे. गेल्या दीड महिन्यापासून घशाचा त्रास होत असल्याने, आवाजावर मर्यादा यायच्या, त्यामुळे रंगभूमीवर संवाद साधणे शक्य होत नव्हते, असे त्यांनी सांगितले. रंगभूमीवरून जरी ते निवृत्त होत असले तरी मालिका आणि चित्रपटांमध्ये ते काम करीत राहणार आहोत.

Web Title: Vikrama Gokhale's exit from theater ..