विद्याची ‘इच्छा’ पूर्ण, मराठी चित्रपटात साकारणार गीता बाली
By Admin | Updated: September 10, 2015 13:28 IST2015-09-10T04:30:46+5:302015-09-10T13:28:39+5:30
‘सब्र का फल मिठा होता है’ असं म्हणतात ते खरेच आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालनने काही दिवसांपूर्वीच मराठी चित्रपटात केवळ मुख्य भूमिकाच नाही

विद्याची ‘इच्छा’ पूर्ण, मराठी चित्रपटात साकारणार गीता बाली
‘सब्र का फल मिठा होता है’ असं म्हणतात ते खरेच आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालनने काही दिवसांपूर्वीच मराठी चित्रपटात केवळ मुख्य भूमिकाच नाही तर त्यासाठी नॅशनल अॅवॉर्ड मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यापैकी विद्याची मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारायची इच्छा पूर्ण झाली आहे. भगवानदादा यांच्या जीवनावर आधारित ‘अलबेला’ या चित्रपटात अभिनेता मंगेश देसाई भगवान दादांची भूमिका साकारत असून गीता दत्तच्या भूमिकेत विद्या बालनला बघायला मिळणार आहे. आता विद्याला या चित्रपटातील भूमिकेसाठी नॅशनल अॅवॉर्ड मिळणार का, ही खरी उत्सुकता आहे.