विद्या बालन रुग्णालयात
By Admin | Updated: December 31, 2015 11:55 IST2015-12-31T01:26:42+5:302015-12-31T11:55:36+5:30
अभिनेत्री विद्या बालनच्या पोटात दुखायला लागल्यामुळे हिंदुजा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. विद्याला किडनी स्टोन झाल्याचे निदान करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

विद्या बालन रुग्णालयात
मुंबई: अभिनेत्री विद्या बालनच्या पोटात दुखायला लागल्यामुळे हिंदुजा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. विद्याला किडनी स्टोन झाल्याचे निदान करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
१ जानेवारी रोजी विद्याचा वाढदिवस असतो, त्यामुळे नववर्ष आणि वाढदिवस असे डबल सेलिब्रेशन करण्यासाठी विद्या तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूरसह परदेशी जात असताना विमानातच तिला त्रास सुरू झाला. त्यामुळे डॉक्टरांना विमानातच पाचारण करण्यात आले व त्यानंतर तिला तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला किडनी स्टोन झाल्याचे निदान करण्यात आे असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.