"२०२६ मध्ये तुझे सर्व चित्रपट जबरदस्त यशस्वी ठरोत..." विद्या बालनच्या वाढदिवशी रितेशची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 14:31 IST2026-01-01T14:30:17+5:302026-01-01T14:31:14+5:30
अभिनेत्री विद्या बालन हिला रितेश देशमुखनं खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

"२०२६ मध्ये तुझे सर्व चित्रपट जबरदस्त यशस्वी ठरोत..." विद्या बालनच्या वाढदिवशी रितेशची पोस्ट
Vidya Balan Birthday : आज बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा वाढदिवस आहे. १ जानेवारी १९७९ रोजी जन्मलेली विद्या बालन आज ४७ वर्षांची झाली आहे. 'परिणीता' आणि 'द डर्टी पिक्चर' सारख्या चित्रपटांमधून ठसा उमटवणाऱ्या विद्याला नॅशनल फिल्म अवॉर्ड आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेलं आहे. विद्याच्या वाढदिवसानिमित्त आज जगभरातील चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अभिनेता रितेश देशमुखने विद्याला हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रितेश देशमुख विद्याचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केलाय. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा, प्रिय विद्या बालन! तुझ्या सौजन्याबद्दल, दयाळूपणाबद्दल आणि प्रगल्भतेबद्दल मी पुरेसे आभार मानूच शकत नाही. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. देव तुला उत्तम आरोग्य, आनंद देवो आणि २०२६ मध्ये तुझे सर्व चित्रपट जबरदस्त यशस्वी ठरोत... हीच मनापासून प्रार्थना", या शब्दात रितेशनं विद्याला शुभेच्छा दिल्यात.

रितेश देशमुख आणि विद्या बालन यांच्यातील मैत्री सिनेसृष्टीत सर्वश्रुत आहे. विशेष म्हणजे विद्या ही रितेशच्या 'राजा शिवाजी' या आगामी भव्य मराठी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.