'Jeev Zala Yeda Pisa' actress falls in Love | 'जीव झाला...' मधील ही अभिनेत्री रिलेशनशीपमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 14:14 IST2021-11-10T14:14:01+5:302021-11-10T14:14:31+5:30
कलर्स मराठीवरील जीव झाला येडापीसा या मालिकेनं अल्पावधीत चाहत्यांना आपलस केलं होतं. ही मालिका संपवल्यानंतर चाहते निराश झाले होते. आजही चाहते शिवा-सिद्धीच्या जोडीला खूप मिस करतात. या मालिकेनंतर शिवा-सिद्धीची ही जोडी दोन म्युझिक अल्बममध्ये झळकली खरी पण चाहत्यांना अजूनही जीव झाला येडापीसा पुन्हा भेटीस यावी असे वाटते. शिवा सिद्धीसोबतच या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा या घराघरात लोकप्रिय झाल्या होत्या. त्यापैकीच एक म्हणजे शिवादादाची बहिण सोनी. सध्या सोनी म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. तिच्या चर्चेत राहण्याचं कारणं म्हणजे शर्वरीचा अभिनेता गौरव मालणकरसोबतचा व्हायरल झालेला एक फोटो ...या फोटोला गौरवने दिलेल्या कॅप्शनमुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्यात. गौरवने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, दिवाळीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...पुढच्या वर्षी तरी "आली माझ्या घरी ही दिवाळी" हे म्हणायची संधी मिळेल का?आणि पुढच्या दिवाळीला "एकाच फोटोत" मी कुर्त्यामध्ये आणि तु साडी मध्ये असण्याची आशा करायला हरकत नाही...कारण तलाव पाळीची मजा रंकाळ्यात नाही... या कॅप्शनवरुन हे दोघे एकमेकांच्या प्रेमात तर नाही ना अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलीये... सध्या शर्वरी जाऊ नको दूर बाबा या मालिकेत झळकत आहे. तर गौरवला आपण फुलपाखरु, तू माझा सांगती सारख्या सिनेमांमध्ये पाहिलं आहे. नुकताच तो जय भवानी जय शिवाजी या मालिकेत जीवा महाला या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला होता. तर मग शर्वरी-गौरवची जोडी तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हीडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी चॅनेलला सबस्क्राईब करा.