Hruta Durgule's Real Life Love Story | ऋताच्या प्रेमाच्या कबुलीवर चाहत्यांची हळहळ | Prateek Shah
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:35 IST2021-11-23T14:35:08+5:302021-11-23T14:35:08+5:30
फुलपाखरु, मन उडू उडू झालय फेम अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही अनेक तरुणांची क्रश आहे. नुकताच ऋताने एक फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. ऋताने ती दिग्दर्शक आणि निर्माता प्रतिक शाह सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबुल केलं होतं. ही आनंदाची बातमी पाहून तिच्या चाहत्यांनी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्यात. तर काहींचा मात्र तिची ही प्रेमाची कबुली ऐकून हार्ट ब्रेक झालाय. हो...ऋताने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत तिच्या चाहत्यांनी तसं म्हटलय...You broke my heart अशा अनेक कमेंट्स तिच्या या पोस्टखाली दिसून येतायेत.