व्हिडीओ - दीपिका आणि विन डीजेलची सेटवरील धमाल, मस्ती
By Admin | Updated: July 29, 2016 16:45 IST2016-07-29T16:19:23+5:302016-07-29T16:45:26+5:30
लिवुडमध्ये आपले बस्तान बसवल्यानंतर दीपिका पदुकोण आता तिच्या आगामी 'XXX: The Return of Xander Cage' या हॉलिवूडपटासाठी चर्चेत आहे.

व्हिडीओ - दीपिका आणि विन डीजेलची सेटवरील धमाल, मस्ती
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - बॉलिवुडमध्ये आपले बस्तान बसवल्यानंतर दीपिका पदुकोण आता तिच्या आगामी 'XXX: The Return of Xander Cage' या हॉलिवूडपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची निराशा केली होती. कारण दीपिका फक्त काही सेकंदासाठी दिसली होती. इन्स्टाग्रामवरुन आपल्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाची चाहत्यांना अपडेट देणा-या दीपिकाने आता सेटवरील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.
यामध्ये सेटवरील धमाल-मस्तीचे चित्रीकरण आहे. दीपिका या चित्रपटातील हॉट लूकमुळे सध्या चर्चेत आहे. तिचा हा लूक अनेकांना घायाळ करत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होणार आहे. ४८ वर्षीय विन डीजेल यामध्ये 'Xander Cage' ची भूमिका निभावताना दिसणार आहे तर दीपिका 'Serena'च्या भूमिकेत दिसणार आहे.