व्हिडिओ - माधुरी, रितेश, अक्षयने बेभान होऊन झिंगाट गाण्यावर धरला ठेका
By Admin | Updated: May 29, 2016 08:36 IST2016-05-29T08:36:18+5:302016-05-29T08:36:18+5:30
मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित यांनाही झिंगाट गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.

व्हिडिओ - माधुरी, रितेश, अक्षयने बेभान होऊन झिंगाट गाण्यावर धरला ठेका
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ : दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सिनेमाने आबालवृध्दांसह समस्त प्रेक्षकवर्गाला ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर ठेका धरू लावणाऱ्या ‘सैराट’ने सामान्यांनाच नाही तर सिने कलाकारांनाही याड लावलं आहे. मराठी कलाकारांपाठोपाठ बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि माधुरी दीक्षित यांनाही झिंगाट गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.
छोट्या पडद्यावर प्रसारित होणा-या सो यू थिंक यू कॅन डान्स या रिअॅलिटी शोमध्ये हाऊसफूल 3च्या टीमने सिनेमाच्या प्रमोशच्या निमित्ताने हजेरी लावली आहे. या शोच्या मंचावर रितेश देशमुख, अक्षय कुमारसह या डान्स शोची जज माधुरी दीक्षितनेही झिंगाट गाण्यावर धुमाकूळ घातला झिंगाटवरील कलाकारांच्या सैराट अंदाजाचा व्हिडीओ अँड टीव्हीह्णच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट करण्यात आला आहे. हा एपिसोड २८ आणि २९ मे रोजी रात्री 8.30 प्रसारित होणार आहेत. माधुरी, रितेश, अक्षय बेभान होऊन झिंगाट गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.
Watch @Riteishd perform on Zinghaat with our very own @MadhuriDixit! #SYTYCD. Sat-Sun, 8.30 pmhttps://t.co/ypexnnQ4FA— &TV (@AndTVOfficial) May 27, 2016
‘फँड्री’तून समाजव्यवस्थेवर दगड भिरकावल्यानंतर नावारूपाला आलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराटमधून पुन्हा माणसाच्या आत्मसन्मानाची गोष्ट सांगितली आहे. जात हा त्यातील एक धगधगता निखारा आहे. परशा आणि आर्चीच्या अल्लड निखळ प्रेमाच्या माध्यमातून उभा केलेला सामाजिक भवताल देशभरातील प्रेक्षकांना भावला आहे. अजय-अतुल यांच्या संगीताच्या ठेक्यावर थिरकायला लावणाऱ्या गाण्यांनी लोकांना भुरळ घातली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मराठी चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.