व्हिडिओ - जॅकी चॅनचा 'बल्ले बल्ले' डान्स
By Admin | Updated: June 15, 2016 10:37 IST2016-06-15T10:10:45+5:302016-06-15T10:37:56+5:30
19व्या शांघाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलच्या दरम्यान गायक दलेर मेंहदी यांच्या तूनक तूनक तून गाण्यावर जॅकी चॅन आणि सोनू सुदने फुल्ल ऑन डान्स करत धम्माल उडवून दिली

व्हिडिओ - जॅकी चॅनचा 'बल्ले बल्ले' डान्स
>ऑनलाइन लोकमत -
शांघाई, दि. 15 - अॅक्शन स्टार जॅकी चॅनला अॅक्शन करताना तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल पण तुम्ही त्याला कधी नाचताना पाहिलय का ? नाही ना...पण नुकतच एका कार्यक्रमात जॅकी चॅनने पंजाबी गाण्यावर डान्स केला. जॅकी चॅनला यावेळी साथ दिली ती अभिनेता सोनू सुदने. 19व्या शांघाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलच्या दरम्यान गायक दलेर मेंहदी यांच्या तूनक तूनक तून गाण्यावर जॅकी चॅन आणि सोनू सुदने फुल्ल ऑन डान्स करत धम्माल उडवून दिली.
अभिनेता सोनू सुदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोनू सूद सध्या जॅकी चॅनसोबत ' कुंग-फू-योगा' चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचं शुटिंग अद्याप सुरु आहे. जॅकी चॅन मार्चमध्ये शुटिंगसाठी भारतातदेखील आला होता. 'कुंग-फू-योगा' हा अॅक्शनपट येत्या ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.
Impromptu dance moves with my brother @EyeOfJackieChan#Shanghai#jackiechangallery#kungfuyogapic.twitter.com/vv8mtLKPtS— sonu sood (@SonuSood) June 14, 2016
विशेष म्हणजे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान या चित्रपटासाठी एक खास ' आयटम नंबर' कोरिओग्राफ करणार असून आता जॅकी चॅन तिच्या तालावर नाचताना दिसणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण फक्त भारतात नव्हे तर चीन आणि इर देशांमध्येही होणार आहे. या गाण्यात जॅकी कुर्ता, धोती आणि मोजडी या पारंपारिक भारतीय वेशातही दिसणार आहे.