VIDEO : हृतिकच्या 'काबिल'चा टीझर रिलीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2016 13:48 IST2016-10-21T11:58:12+5:302016-10-21T13:48:46+5:30
अभिनेता हृतिक रोशनच्या बहुचर्चित 'काबिल' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे.

VIDEO : हृतिकच्या 'काबिल'चा टीझर रिलीज
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - अभिनेता हृतिक रोशनच्या बहुचर्चित 'काबिल' चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून हृतिकने ट्विरवर तो शेअर केला आहे. 2017 सालच्या सुरूवातीस म्हणजेच जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणारा हा चित्रपट एक प्रेमकहाणी असून हृतिकसोबत अभिनेत्री यामी गौतमही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
सुझानसोबत झालेला डिव्होर्स आणि त्यानंतर कंगना राणौतने केलेली चिखलफेक या वैयक्तिक आयुष्यातील अडणचणींमुळे हतबल झालेल्या हृतिक रोशनने गेल्या दोन वर्षांत व्यावसायिक आयुष्यातही फारसे यश चाखलेले नाही. क्रिश-3 ला मिळालेले सरासरी यश, बँग बँग आणि आशुतोष गोवारीकरचा महत्त्वाकांक्षी ' मोहेंजोडादो' या चित्रपटांचे अपयश, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या असत्या, गेली दोन वर्ष हृतिकसाठी तशी थंडच गेली आहेत. त्यामुळे 'काबिल'कडूनच्या त्याला ब-याच आशा आहेत. मात्र बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याचा बहुचर्चित 'रईस'ही जानेवारीमध्ये रिलीज होणार असल्याने त्या दोघांच्याही चित्रपटाची बॉक्स ऑफीसवर टक्कर होणार आहे.