व्हिडिओ - 'दि कपिल शर्मा' शो मध्ये 'सैराट'ची धूम

By Admin | Updated: June 7, 2016 15:30 IST2016-06-06T07:43:16+5:302016-06-07T15:30:25+5:30

संपूर्ण देशातच नव्हे परदेशातील लोकांनाही वेड लावणा-या नागराज मंजुळेच्या 'सैराट'चे वेड पार हिंदीपर्यंत पोहोचले असून प्रसिद्ध 'कपिल शर्मा शो'मध्येही सैराटच्या कलाकारांनी धूम माजवली.

Video - Dhar of 'Sairat' in 'The Kapil Sharma' show | व्हिडिओ - 'दि कपिल शर्मा' शो मध्ये 'सैराट'ची धूम

व्हिडिओ - 'दि कपिल शर्मा' शो मध्ये 'सैराट'ची धूम

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - संपूर्ण देशासह परदेशातील प्रेक्षकवर्गालाही ‘झिंग झिंग झिंगाट’च्या तालावर ठेका धरू लावणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाने आणखी एक गगनभरारी घेतली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ची जादू प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मावरही झाली असून या कलाकारांनी ' दि कपिल शर्मा'शो मध्ये हजेरी लावली आहे. या एपिसोडचे शूटिंग नुकतच पार पडलं, मात्र तो एपिसोड कधी टेलिकास्ट होणार आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. 
'सैराट'च्या निमित्ताने पहिल्यांदाच कोणत्यातरी मराठी सिनेमाच्या यशाचे हिंदीतही जोरदार सेलिब्रेशन झालं.  बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढत सैराट सिनेमानं नवीन विक्रम प्रस्थापित केला. अवघ्या महिन्याभराच्या कालावधीत सैराटने ८० कोटींचा गल्ला जमवला. नागराज मंजूळेच्या या सिनेमातील परश्या आणि आर्चीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भुरळ घातली असून सर्वाधिक कमाई करणारा सैराट हा पहिला मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलाय. 
 
‘फँड्री’तून समाजव्यवस्थेवर दगड भिरकावल्यानंतर नावारूपाला आलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराटमधून पुन्हा माणसाच्या आत्मसन्मानाची गोष्ट सांगितली आहे. जात हा त्यातील एक धगधगता निखारा आहे. परशा आणि आर्चीच्या अल्लड निखळ प्रेमाच्या माध्यमातून उभा केलेला सामाजिक भवताल देशभरातील प्रेक्षकांना भावला आहे. अजय-अतुल यांच्या संगीताच्या ठेक्यावर थिरकायला लावणाऱ्या गाण्यांनी लोकांना भुरळ घातली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मराठी चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.
दरम्यान यापूर्वी शाहरुख खान, सोनम कपूर व जॉन अब्राहम यांच्यासारखे बॉलिवूडचे कलाकार त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी चला हवा येऊ द्या या मराठी शोमध्ये आले होते. 

Web Title: Video - Dhar of 'Sairat' in 'The Kapil Sharma' show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.