VIDEO : अनुष्काच्या 'फिल्लौरी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

By Admin | Updated: February 6, 2017 13:51 IST2017-02-06T13:44:01+5:302017-02-06T13:51:46+5:30

अनुष्का शर्माचा आगामी सिनेमा 'फिल्लौरी'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर पाहताना हा सिनेमा नेहमीच्या बॉलिवूड मसाला सिनेमांपेक्षा जरा हटके वाटत आहे

VIDEO: Anushka's 'Filylauri' movie trailer release | VIDEO : अनुष्काच्या 'फिल्लौरी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

VIDEO : अनुष्काच्या 'फिल्लौरी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - अनुष्का शर्माचा आगामी सिनेमा 'फिल्लौरी'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर पाहताना हा सिनेमा नेहमीच्या बॉलिवूड मसाला सिनेमांपेक्षा जरा हटके वाटत आहे. इमोशन्स, कॉमेडीसहीत ट्रेलरमध्ये अनुष्का आणि दिलजीत दोसांझच्या रोमान्सची झलकही पाहायला मिळत आहे. 
 
या रोमँटिक कॉमेडी सिनेमात अनुष्का-दिलजीतव्यतिरिक्त सूरज शर्माचीही मुख्य भूमिका आहे. अनुष्का या सिनेमात भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. शेवटची इच्छा अपूर्ण राहिल्याने तिचा आत्मा भटकत असल्याचे दाखवण्यात आले असून ती केवळ सूरज शर्मालाच दिसू शकते. अनुष्का यात यात अगदी नव्या अंदाजात, नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.  'सुंदर पंजाबी कुडी'च्या लूकमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे.  
 
सूरज शर्माला मंगळ असल्याने पत्नीसोबत विवाह होण्यापूर्वी त्याचे लग्न एका झाडासोबत लावले जाते. त्यामुळे या झाडावर राहणारे भूत म्हणजे अनुष्का शर्मा,'माझ्यासोबत लग्न झालेले असताना तू दुस-या कोणासोबत कसे काय लग्न करू शकतोस? असे वारंवार विचारुन त्याला सतावत असते. 
 
यानंतर झाड, लग्न, भूत यामुळे कसा गोंधळ उडवतो, याचीच ही जरा हटके कहाणी आहे. हाच सगळा गोंधळ तुम्हाला 24 मार्चरोजी बॉक्सऑफिसवर पाहायला मिळेल. दरम्यान, अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसचा 'फिल्लौरी' हा दुसरा सिनेमा आहे. याआधी अनुष्काने एनएच 10 सिनेमाची निर्मिती केली होती, यात तिची मुख्य भूमिका होती.   
 

Web Title: VIDEO: Anushka's 'Filylauri' movie trailer release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.