VIDEO: बाहुबलीच्या तिकीटासाठी तब्बल 3 किमी लांब रांग

By Admin | Updated: April 27, 2017 11:01 IST2017-04-27T10:47:39+5:302017-04-27T11:01:24+5:30

तब्बल तीन किमी लांब रांगेत उभं राहून लोक बाहुबलीचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

VIDEO: 3 km long queue for the Bahubali ticket | VIDEO: बाहुबलीच्या तिकीटासाठी तब्बल 3 किमी लांब रांग

VIDEO: बाहुबलीच्या तिकीटासाठी तब्बल 3 किमी लांब रांग

>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 27 - आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट "बाहुबली 2" रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. फस्ट डे फस्ट शो पाहायला मिळावा यासाठी चाहते थिएटबाहेर रांगा लावत आहेत. चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून कटप्पाने बाहुबलीला का मारलं ? या प्रश्नाचं उत्तर सर्वात आधी आपल्याला मिळावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बाहुबलीच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाल्यापासून थिएटर, मल्टिप्सेक्सना एक क्षणही विश्रांती मिळालेली नाही. हैदराबादमध्ये तर बाहुबलीचं वादळच आलं असून तिकीट मिळवण्यासाठी लोक एका थिटपासून दुस-या थिएटर्यंत चकरा मारत आहेत. 
 
बाहुबली चित्रपटाचं हे वेड सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लोकांची रांग लागलेली असून तब्बल तीन किमी लांब रांगेत उभं राहून लोक तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. नेकलेस रोडवरील प्रसाद आयमॅक्स थिएटरच्या बाहेर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सकाळी सात वाजता हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. इतक्या सकाळी तीन किमी लांब रांग लागली म्हणजे लोकांनी किती वाजल्यापासून रांग लावायला सुरु केली असेल विचार करा.
 
अनेकांनी तिकीट न मिळाल्याने निराशा झाली. अनेकजण मोकळ्या हाती परतले. अनेकजणांची ऑनलाइन आणि तिकीट बारी दोन्हीकडेही निराशा झाली. 
 
तिकीटाचा दर सध्या 250 पर्यत असून 600 पर्यंत जाऊ शकतो. चित्रपट पाहण्याची लोकांना इतकी उत्सुकता आहे की, ब्लॅकने विकणारे तब्बल एक हजारापासून ते चार हजारापर्यंत तिकीट विक्री करत आहेत. पहिल्या भागाने 650 कोटींची कमाई केली होती. बाहुबली 2 सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 1000 कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे.