ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांची पुण्यतिथी

By Admin | Updated: August 11, 2016 11:52 IST2016-08-11T11:52:11+5:302016-08-11T11:52:55+5:30

ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांची आज (११ ऑगस्ट) पुण्यतिथी

Veteran actor P. Jayaraj's death anniversary | ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांची पुण्यतिथी

ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांची पुण्यतिथी

>संजीव वेलणकर
पुणे, दि. ११ - ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांची पुण्यतिथी. २८ सप्टेंबर १९०९ रोजी जन्मलेले पी. जयराज यांनी हिंदी, मराठी, गुजराथी चित्रपटात कामे केली बोलपटाच्या काळात त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेमधील चित्रपटात कामे केली. मा.पी. जयराज यांनी १७० हून अधिक चित्रपट मध्ये कामे केली.१९२९ च्या"जगमगाती जवानी या मूकपटा पासून  ते१९७५चा "शोले" पर्यतचा त्यांना अभिनेता म्हणून प्रवास थक्क करणारा होता. व्ही.शांताराम, पृथ्वीराज कपूर, मोतीलाल यांच्या बरोबर पी. जयराज यांनी कामे केली. त्यांनी मोहर, माला, प्रतिमा,राजघर,सागर अशा चित्रपटांचे दिग्दर्शन पण केले. १९८० साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मा.पी.जयराज यांचे निधन ११ ऑगस्ट २००० रोजी झाले. मा.पी.जयराज यांना लोकमत समूहाकडून आदरांजली.
 
संदर्भ:- इंटरनेट

Web Title: Veteran actor P. Jayaraj's death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.