ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार रुग्णालयात दाखल
By Admin | Updated: December 3, 2015 08:59 IST2015-12-03T08:57:00+5:302015-12-03T08:59:30+5:30
प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार रुग्णालयात दाखल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते उपचारांना साथ देत असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
७८ वर्षीय मनोजकुमार यांना श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्याने काल (बुधवार) रात्री त्यांना उपचारांसाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत मीडियाला सध्या कोणतीही माहिती देऊ नये अशी विनंती त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आल्याने रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला.
देशभक्तीपर भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या मनोज कुमार यांना 'भारतकुमार' असंही संबोधलं जातं. त्यांनी ' शहीद', 'पूरब और पश्चिम', 'उपकार', 'क्रांती', आणि 'रोटी कपडा और मकान' यासह अनेक प्रसिद्ध चित्रपटात काम केलं होतं.