वैभवी शांडिल्य ‘एक अलबेला’मध्ये विशेष भूमिकेत

By Admin | Updated: December 16, 2015 01:18 IST2015-12-16T01:18:36+5:302015-12-16T01:18:36+5:30

वैभवी शांडिल्य कोण ओळखलंत का? ‘जाणिवा’ चित्रपटामधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलेली अशी ही अभिनेत्री. हा चित्रपट जास्त चालला नाही, तरी चित्रपटातील तिचा प्रेझेंंस

Vaibhavi Shandilya plays a special role in 'A Albella' | वैभवी शांडिल्य ‘एक अलबेला’मध्ये विशेष भूमिकेत

वैभवी शांडिल्य ‘एक अलबेला’मध्ये विशेष भूमिकेत

वैभवी शांडिल्य कोण ओळखलंत का? ‘जाणिवा’ चित्रपटामधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलेली अशी ही अभिनेत्री. हा चित्रपट जास्त चालला नाही, तरी चित्रपटातील तिचा प्रेझेंंस नक्कीच लक्षवेधी ठरला. ‘लॉर्ड आॅफ शिंगणापूर’ हा तिचा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर असला, तरी एक मोठी बातमी म्हणजे, मंगेश देसाई आणि विद्या बालन यांच्या ‘एक अलबेला’ मध्ये ती विशेष भूमिकेत दिसणार आहे. भगवानदादांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटातून विद्या बालन मराठीत प्रवेश करीत आहे, हे सर्वश्रृत आहेच. यात विद्या समवेत ती रूपरी पडद्यावर दिसणार असल्याने, ती ‘सातवे आसमान पर’ आहे. भगवानदादा यांचे पहिले प्रेम असलेल्या ‘शाहीन’ या मुस्लीम मुलीची भूमिका ती करणार आहे. वैभवी सांगते, या चित्रपटात एकही शॉट विद्या बालन यांच्यासमवेत नसल्याने थोडेसे वाईट वाटते, पण या चित्रपटाचा एक भाग होण्याची संधी मिळाली, याचाच खूप आनंद आहे.

Web Title: Vaibhavi Shandilya plays a special role in 'A Albella'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.