वयाच्या ७९व्या वर्षी घरात एकट्या राहतात उषा नाडकर्णी, रडून सांगितलं दुःख, म्हणाल्या- "कधी पडले तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:12 IST2025-06-03T12:12:23+5:302025-06-03T12:12:58+5:30
Ankita Lokhande And Usha Nadkarni : अंकिता लोखंडेने तिच्या मुंबईतील घरी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तिने मालिकेत सविता देशमुखची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांना आमंत्रित केले होते.

वयाच्या ७९व्या वर्षी घरात एकट्या राहतात उषा नाडकर्णी, रडून सांगितलं दुःख, म्हणाल्या- "कधी पडले तर..."
अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande)ला सिनेइंडस्ट्रीमध्ये १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या ती 'लाफ्टर शेफ्स २' मध्ये दिसत आहे. ती एक यूट्यूब चॅनेल देखील चालवते ज्यामध्ये ती व्लॉगिंग करते. लेटेस्ट व्हिडिओमध्ये, ती 'पवित्र रिश्ता' मधील अर्चनासारख्या गेटअपमध्ये दिसली आणि तिच्यासोबत ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णी(Usha Nadkarni)देखील दिसल्या. अंकिता लोखंडेने २००९ मध्ये आलेल्या पवित्र रिश्ता (Pavitra Rishta Serial) या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केले होते. त्यात सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) देखील दिसला होता. व्हिडीओमध्ये उषा नाडकर्णी आणि अंकिता खूप गप्पा मारत होत्या, ज्यामध्ये एक क्षण असा होता की डोळे पाणावले होते.
अंकिता लोखंडेने तिच्या मुंबईतील घरी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तिने मालिकेत सविता देशमुखची भूमिका साकारणाऱ्या उषा नाडकर्णी यांना आमंत्रित केले होते. लोकांना दोघांचे पुनर्मिलन खूप आवडले. त्यांनी व्हिडीओमध्ये सेटशी संबंधित गोष्टी शेअर केल्या. २ जून रोजी युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उषा ताईंनी सांगितले की, ७९ वर्षांच्या वयातही त्या मुंबईसारख्या महानगरात एकट्या राहतात.
उषा नाडकर्णी मुंबईत राहतात एकट्या
उषा ताई म्हणाल्या की, 'मी घरी एकटी आहे, मला भीती वाटते की मी पडेन आणि कोणालाही कळणार नाही. गेल्या वर्षी ३० जून रोजी माझा भाऊ वारला. जर त्याला माहित असते की, मी काही संकटात आहे, तर तो माझ्याकडे धावत आला असता. आता मी कोणाला सांगू?' हे बोलताच त्या रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अंकिता आणि विकी जैन त्यांचे बोलणं ऐकत होते.
अंकिताने दिल्या सुशांतच्या आठवणींना उजाळा
अंकिता लोखंडे उषा नाडकर्णींचे कौतुक करत म्हणाली, 'आई खूप मजबूत आहे. ती एकटी राहते. ती इतक्या लोकांसोबत एकटी राहते. मी इतक्या वर्षांपासून 'आई'ला पाहत आहे.' सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत अभिनेत्री म्हणाली, 'सुशांत खूप चांगला अभिनेता होता. तो मला खूप मदत करायचा कारण जेव्हा मी सर्व कलाकारांसमोर जायचे तेव्हा मला इतके मोठे सीन कसे करायचे याबद्दल खूप भीती वाटत असे. तो मला शिकवायचा.'