एकताची बालाजी टेलिफिल्मस चित्रपट निर्मिती गुंडाळणार ?
By Admin | Updated: August 29, 2016 15:20 IST2016-08-29T15:20:42+5:302016-08-29T15:20:42+5:30
बालाजी टेलिफिल्मसचे चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे बालाजी मोशन पिक्चर्स चित्रपट निर्मितीचा व्यवसाय स्थगित करण्याच्या विचारात आहे.

एकताची बालाजी टेलिफिल्मस चित्रपट निर्मिती गुंडाळणार ?
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - अलीकडच्या काळातील बालाजी टेलिफिल्मसचे चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे बालाजी मोशन पिक्चर्स चित्रपट निर्मितीचा व्यवसाय स्थगित करण्याच्या विचारात आहे. ग्रेट ग्रँण्ड मस्ती, क्या सुपर कुल हैं हम ३ हे बालाजीचे चित्रपट फ्लॉप झाले. डिसने इंडिया प्रमाणे बालाजी टेलिफिल्मस चित्रपट निर्मिती बंद करेल अशी इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरु आहे.
कंपनीचे सीईओ समीर नायर म्हणाले की, चित्रपट निर्मिती बंद करण्याचा विचार नाही मात्र यापुढे कंपनी चित्रपट निर्मितीचा निर्णय घेताना अधिक काळजीपूर्वक विचार करेल. ग्रेट ग्रँण्ड मस्ती, क्या सुपर कुल हैं हम ३ या चित्रपटांमुळे आमचे नुकसान झाले पण उडता पंजाब आणि अझरमुळे आमचे नुकसान भरुन निघाले असे त्यांनी सांगितले.
चेतन भगतच्या 'हाफ गर्लफ्रेंड' कांदबरीवर आधारीत चित्रपटाची निर्मिती सध्या कंपनी करत असून, या चित्रपटाच्या यशावर चित्रपट निर्मितीची पुढची गणिते अवलंबून आहेत.