दोन बहिणींचा ‘फॅमिली कट्टा’

By Admin | Updated: October 8, 2016 01:37 IST2016-10-08T01:37:05+5:302016-10-08T01:37:05+5:30

‘फॅमिली कट्टा’ या चित्रपटातून कुटुंबातील नात्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे

Two sisters 'family cottage' | दोन बहिणींचा ‘फॅमिली कट्टा’

दोन बहिणींचा ‘फॅमिली कट्टा’


‘फॅमिली कट्टा’ या चित्रपटातून कुटुंबातील नात्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, हे आपल्याला माहीतच आहे. पण, या चित्रपटाची निर्मिती कोणी
केली, हे तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटाची निर्मिती चित्रपटसृष्टीतील दोन बहिणींनी केलीय. अभिनेत्री वंदना गुप्ते आणि राणी वर्मा यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. वंदना आणि राणी या दोन बहिणींनी स्वत:चे सिस्टर कन्सर्न नावाचे प्रोडक्शन हाउस उघडले आहे. या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत रीलीज होणारा फॅमिली कट्टा हा पहिला चित्रपट आहे. वंदना गुप्ते यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट, नाटके, मालिका यांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. तर, राणी वर्मा या उत्तम गायिका आहेत. आता या दोन बहिणींनी आणलेला हा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतोय, हे आपल्याला लवकरच समजेल.

Web Title: Two sisters 'family cottage'