झी मराठीवर लवकरच दाखल होणार दोन नवीन मालिका, 'पारू' आणि 'शिवा' भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 12:57 IST2023-12-28T12:56:45+5:302023-12-28T12:57:14+5:30

Zee Marathi : सध्या झी मराठी वाहिनीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी दोन नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Two new serials, 'Paru' and 'Shiva' are coming soon on Zee Marathi | झी मराठीवर लवकरच दाखल होणार दोन नवीन मालिका, 'पारू' आणि 'शिवा' भेटीला

झी मराठीवर लवकरच दाखल होणार दोन नवीन मालिका, 'पारू' आणि 'शिवा' भेटीला

सध्या झी मराठी वाहिनीवर वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी दोन नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. हे प्रोमो पाहून प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मालिकेचं नाव आहे 'पारू' आणि 'शिवा'. 

झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर एक नवीन प्रोमो सगळ्यांनी पाहिलाच असेल. झी मराठी लवकरच घेऊन येत आहे आपल्या  प्रेक्षकांसाठी दोन सुंदर मालिका  'पारू' आणि 'शिवा'. दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका, दोन नव्या गोष्टी. माणुसकीला जपणारी , आपुलकीने वागणारी,  मनसोक्त हसणारी, नितळ पारू जणू  झरझरणारा अवखळ झरा. अश्या नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे 'शरयू सोनावणे'. 

अगदी त्याच्या विरुद्ध अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, बिंधास्त जगणारी, निडर 'शिवा' , जणू धगधगता पेटता निखारा. ह्या निखाऱ्याचं नाव आहे 'पूर्वा अमोघ फडके'. पूर्वाला आतापर्यंत न पाहिलेल्या अशा अवतारात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तर अशा ह्या दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी प्रेक्षकांना आपलेसे करून घेतील यात शंकाच नाही. 

Web Title: Two new serials, 'Paru' and 'Shiva' are coming soon on Zee Marathi