लग्नाच्या तीन महिन्यांतच दिव्या अग्रवालचा मोडला संसार? लग्नाचे फोटो डिलीट केल्याने चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:35 PM2024-05-27T17:35:44+5:302024-05-27T17:36:28+5:30

दिव्या आणि अपूर्वने सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. 

tv actress divya agarwal deleted her wedding photos from social media splits divorce rumours | लग्नाच्या तीन महिन्यांतच दिव्या अग्रवालचा मोडला संसार? लग्नाचे फोटो डिलीट केल्याने चर्चेला उधाण

लग्नाच्या तीन महिन्यांतच दिव्या अग्रवालचा मोडला संसार? लग्नाचे फोटो डिलीट केल्याने चर्चेला उधाण

टीव्ही अभिनेत्री दिव्या अग्रवाल तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वीच दिव्याने बॉयफ्रेंड अपूर्व पाडगांवकरसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. पण, आता लग्नानंतर काहीच दिवसांत तिच्या संसारात वादळ आल्याचं म्हटलं जात आहे. दिव्या आणि अपूर्वने सोशल मीडियावरुन त्यांच्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. 

'बिग बॉस' फेम दिव्या अग्रवालने २० फेब्रुवारी २०२४ रोजी अपू्र्वशी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केलं होतं. दिव्या आणि अपू्र्वच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नात दिव्याने जांभळ्या रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. त्याचीदेखील सर्वत्र चर्चा होती. लग्नानंतर दिव्या आणि अपूर्व हनीमूनलाही गेले होते. पण, हनीमूनवर परतल्यानंतर मात्र त्या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. त्यामुळे लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यांत त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा आहेत. 

दिव्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर १९ मार्च रोजी केलेली शेवटची पोस्ट दिसत आहे. हा एक ब्रँडच्या जाहिरातीचा व्हिडिओ आहे. तिच्या अकाऊंटवर अपूर्वबरोबरचा एकही फोटो दिसत नाही. त्यामुळे दिव्या आणि अपूर्वमध्ये खरंच दुरावा आला आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हा पीआर किंवा पब्लिसिटी स्टंट असल्याचं काहींचं म्हणणं आहे. दिव्याबरोबरच अपूर्वने देखील त्याच्या लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत.  दरम्यान, दिव्या आणि अपू्र्व काही दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये एकत्र दिसले होते. 

दिव्या आणि अपूर्व गेल्या जवळपास ९ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी २०२४ मध्ये लग्नगाठ बांधली. दिव्या हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसंच ती 'बिग बॉस ओटीटी' १ ची विजेती सुद्धा आहे. रोडीजमध्येही दिव्या सहभागी झाली होती. 

Web Title: tv actress divya agarwal deleted her wedding photos from social media splits divorce rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.