सूर जुळले...! मराठमोळी गायिका आनंदी जोशीनं गायक जसराज जोशीसोबत बांधली गुपचूप लग्नगाठ, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 09:32 IST2023-08-12T09:31:38+5:302023-08-12T09:32:08+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून मराठी कलाविश्वातील कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली. दरम्यान आता संगीत क्षेत्रातील आणखी एक कलाकार जोडी विवाहबंधनात अडकली आहे.

Tune in...! Marathmoli singer Anandi Joshi secretly tied the knot with singer Jasraj Joshi, photos surfaced | सूर जुळले...! मराठमोळी गायिका आनंदी जोशीनं गायक जसराज जोशीसोबत बांधली गुपचूप लग्नगाठ, फोटो आले समोर

सूर जुळले...! मराठमोळी गायिका आनंदी जोशीनं गायक जसराज जोशीसोबत बांधली गुपचूप लग्नगाठ, फोटो आले समोर

मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून मराठी कलाविश्वातील कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम,आकाश पाटील, रश्मी पाटील, प्रतीक सुरेश  या मराठमोळ्या कलाकारांचा लग्नसोहळा पार पडला. दरम्यान ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधील पंचरत्नांपैकी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आता संगीत क्षेत्रातील आणखी एक कलाकार जोडी विवाहबंधनात अडकली आहे. आता तुम्ही म्हणाल कोण आहेत ते दोघे? तर ही जोडी म्हणजे गायिका आनंदी जोशी (Aanandi Joshi) आणि गायक जसराज जोशी (Jasraj Joshi).

आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी ११ ऑगस्टला कोर्ट मॅरिज केले आहे. त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी कोर्टातले लग्नादरम्यानचे फोटो शेअर करत म्हटले की, अत्यंत आदराने, आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवत आहोत. तुमचे आशीर्वाद असू द्यात. आनंदी आणि जसराजला कलाविश्वातील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

आनंदी जोशी २००६ -२००७ची सा रे ग मा पा या रिअॅलिटी म्युझिक शोमध्ये तिसरी रनर अप होती. तिने हृदयांतर, ट्रकभर स्वप्न या चित्रपटांसाठी गायन केले आहे. याशिवाय तिने बऱ्याच चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. तसेच काही मालिका आणि नाटकांच्या शीर्षक गीतांना स्वरसाज दिला आहे. तर जसराज हा हिंदी सारेगमप २०१२चा विजेता ठरला होता. जसराजने बऱ्याच चित्रपटातील गाणी गायली आहेत. तसेच जसराजने संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांसाठी आनंदीने पार्श्वगायन देखील केले आहे.
 

Web Title: Tune in...! Marathmoli singer Anandi Joshi secretly tied the knot with singer Jasraj Joshi, photos surfaced