‘पोलीस लाईन’मधील सत्य उलगडणार
By Admin | Updated: December 11, 2015 01:41 IST2015-12-11T01:41:53+5:302015-12-11T01:41:53+5:30
पोलीस म्हणजे केवळ सिग्नलच्या पुढे थांबून पावत्या फाडणारे, कारण नसताना गुन्ह्यात अडकवू पाहणारे, अत्याचार करणारे असे, नाहीतर मग एकदम डॅशिंग, कितीही गोळ्या लागूनही जिवंत राहणारे

‘पोलीस लाईन’मधील सत्य उलगडणार
पोलीस म्हणजे केवळ सिग्नलच्या पुढे थांबून पावत्या फाडणारे, कारण नसताना गुन्ह्यात अडकवू पाहणारे, अत्याचार करणारे असे, नाहीतर मग एकदम डॅशिंग, कितीही गोळ्या लागूनही जिवंत राहणारे, असे काल्पनिक चित्रच आजवर आपल्यासमोर तयार केले गेले आहे, पण पोलिसांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांना मिळणारे वेतन या विषयांवर फारच कमी वेळा बोलण्यात येते. इतकेच काय, तर २६ नोव्हेंबरच्या मुंबईतील आतंकवादी हल्ल्याच्या वेळी पोलिसांना साधी बुलेटप्रूफ जॅकेटही उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे एटीएस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे हे आपले शूरवीर धारातीर्थी पडले. अशा शहीद जवानांच्या घरच्यांना पुढे अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. अशा या संपूर्ण वास्तवावर परखड भाष्य करणारा ‘पोलीस लाईन’ हा चित्रपट येत आहे. यामध्ये पोलीस लाईनमधील राहणाऱ्या पोलिसांना, त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, हे पाहायला मिळणार आहे. राजू पार्सेकर चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये अभिनेता संतोष जुवेकर मुख्य भूमिका साकारत असून, निशा परुळेकर, विजय कदम, सायली संजीव, जयवंत वाडकर, प्रदीप खाबरे महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.