ट्रिपल जंप शिकतेय कंगना

By Admin | Updated: October 12, 2014 00:35 IST2014-10-12T00:35:38+5:302014-10-12T00:35:38+5:30

बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची कंगना राणावतची इच्छा आहे. आनंद रॉय यांच्या ‘तनू वेडस् मनू’मध्ये कंगना एका हरयाणवी अॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे.

Triple jump teaches Kangana | ट्रिपल जंप शिकतेय कंगना

ट्रिपल जंप शिकतेय कंगना

>बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची कंगना राणावतची इच्छा आहे. आनंद रॉय यांच्या ‘तनू वेडस् मनू’मध्ये कंगना एका हरयाणवी अॅथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी ती भरपूर मेहनत करीत असल्याचेही समजते. सूत्रंनुसार कंगना सध्या ट्रिपल जंपचे प्रशिक्षण घेत आहे. हा खूपच कठीण खेळप्रकार असल्याचे म्हटले जाते. त्यासाठी खूप सराव करावा लागतो आणि अनुभवाचीही गरज असते. फिटनेस आणि वर्कआऊटसह या खेळासाठी लवचिकता मिळवण्यासाठीही कंगनाचे प्रयत्न सुरू आहेत. सुनीता दुबे आणि आकाश कुचेकर तिला या खेळाचे प्रशिक्षण देत आहेत. याबाबत आनंद रॉय सांगतात की, ‘कंगना आणखी एक धमाका करायला तयार आहे. ती चित्रपटात टिपल जंप करताना दिसेल.’

Web Title: Triple jump teaches Kangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.