ट्रेंड ‘बायोपिक’चा!

By Admin | Updated: June 4, 2016 01:10 IST2016-06-04T01:10:38+5:302016-06-04T01:10:38+5:30

रूपेरी पडद्यावर एक्शन, कॉमेडी, रोमँटिक लव्हस्टोरी रसिकांना भावतात. मात्र रसिकांना प्रेरणा देणारे सिनेमा म्हणजे बायोपिक. बायोपिक सिनेमा बॉक्स आॅफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे करू

Trend biopic! | ट्रेंड ‘बायोपिक’चा!

ट्रेंड ‘बायोपिक’चा!

रूपेरी पडद्यावर एक्शन, कॉमेडी, रोमँटिक लव्हस्टोरी रसिकांना भावतात. मात्र रसिकांना प्रेरणा देणारे सिनेमा म्हणजे बायोपिक. बायोपिक सिनेमा बॉक्स आॅफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे करू शकतात हे ह्यभाग मिल्खा भागह्ण, ह्यमेरी कॉमह्ण सनेमांनी दाखवलंय. बॉलिवूडमध्ये सिनेमांचा हिट फॉर्म्युला म्हणजे बायोपिक सिनेमा. त्यामुळंच येत्या काही महिन्यांत बॉक्स आॅफिसवर बायोपिक सिनेमांची जणू माळ लागलीय. भविष्यात कोणा कोणावर बायोपिक बनवण्यात येणार याचा घेतलेला हा आढावा.
चक दे सिनेमात कबीर खान ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या शाहरुखचं हॉकीप्रेम प्रेक्षकांनी अनुभवलंय. बॉलिवूडचा किंग शाहरुख हा हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांची भूमिका साकारणार आहे. अग्निपथ सिनेमाची कथा लिहणाऱ्या इला बेदी दत्ता ध्यानचंद यांच्या सिनेमावर काम करतायत.
बॉलिवूडचा बर्फी रणबीर कपूरसुद्धा येत्या काळात काही बायोपिक सिनेमांमध्ये झळकणार आहे. बर्फीच्या यशानंतर रणबीर आणि अनुराग पुन्हा एकत्र येणार आहेत. यावेळी अनुराग किशोर कुमार यांच्या जीवनावर सिनेमा बनवणार आहे. या सिनेमात रणबीर किशोरदांची भूमिका साकारणार आहे. किशोर कुमार यांची भूमिका साकारल्यानंतर मुन्नाभाई संजय दत्तची भूमिकासुद्धा रणबीर साकारणार आहे. संजय दत्तचं जीवन कायमच वाद आणि विविध गोष्टींमुळं गाजलंय. त्यामुळंच की काय मुन्नाभाई साकारणाऱ्या राजकुमार हिरानी यांनी संजय दत्तवर सिनेमा बनवण्याचं ठरवलंय.
बॉलिवूडची ऊलाला गर्ल विद्या बालन सध्या तिच्या मराठी सिनेमातील पदार्पणामुळं चर्चेत आहे. विद्याचा पहिला मराठी सिनेमासुद्धा एक बायोपिक आहे. भगवानदादा यांच्या जीवनावर बनणाऱ्या सिनेमात विद्या गीता बाली यांच्या भूमिकेत झळकतेय. याशिवाय आगामी काळातही विद्याकडे बऱ्याच बायोपिक सिनेमांची आॅफर आहे. विद्या शास्त्रीय गायिकेच्या भूमिकेतही दिसणार असल्याच्या चर्चा आहे. प्रसिद्ध कन्नड शास्त्रीय गायिक एम.एस.सुब्बालक्ष्मी यांच्या जीवनावर बनणाऱ्या सिनेमात विद्या प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय आर्यन लेडी आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील सिनेमातही विद्या झळकणार असल्याच्या
चर्चा आहेत.
पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या जीवनावर बनणाऱ्या सिनेमाचीही चर्चा सुरू आहे. या सिनेमातील बेनझीर यांची भूमिका अभिनेत्री रवीना टंडन साकारणार असल्याचं समजतंय. याशिवाय क्रांतीकारी खुदीराम बोस, सुचित्रा सेन, यांच्या जीवनावरील चरित्रात्मक सिनेमांची तयारी बॉलिवूमध्ये सुरू आहे. त्यामुळं जस्ट वेट एंड वॉच.

Web Title: Trend biopic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.