ऐश्वर्याच्या सौंदर्याला सुभाषच्या मेकअपचा टच
By Admin | Updated: April 21, 2016 08:23 IST2016-04-21T01:47:38+5:302016-04-21T08:23:33+5:30
बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रॉय हिच्या रूपाचे तर करोडो चाहते आपल्याला जगभरात पहायला मिळतील. सिनेमामध्ये काम करताना या हिरोईनना त्यांचे रूप अधिक खुलविण्यासाठी अन् चेहऱ्याव

ऐश्वर्याच्या सौंदर्याला सुभाषच्या मेकअपचा टच
बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रॉय हिच्या रूपाचे तर करोडो चाहते आपल्याला जगभरात पहायला मिळतील. सिनेमामध्ये काम करताना या हिरोईनना त्यांचे रूप अधिक खुलविण्यासाठी अन् चेहऱ्यावर चार चाँद लावण्यासाठी मेकअप तर करावाच लागतो. बऱ्याचदा चित्रपटातील कथेनुसार अन् कॅरेक्टरच्या डीमांडमुळे मेकअप एक्स्परिमेंट करावा लागतो. ऐश्वर्या रॉयच्या ‘सरबजीत’ या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये ऐश्वर्या सरबजीतच्या बहिणीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिला पंजाबी लुक तर द्यायचाच होता; शिवाय सरबजीतच्या बहिणीसारखे दिसायचे होते. ही सगळी कमाल होणार होती फक्त मेकअपमुळेच. या चित्रपटातील ऐश्वर्या अन् रिचा चढ्ढा या दोन हिरोईनच्या मेकअपची जबाबदारी यशस्वारीत्या पेलली आहे ती मराठमोळ्या मेकअप आर्टिस्ट सुभाष शिंदे यांनी. ‘राम लीला’, ‘ग्रॅन्ड मस्ती’, ‘मेरी कोम’, ‘पटियाला हाऊस’ यासारख्या चित्रपटांमध्ये मेकअप मॅन म्हणून सुभाष यांनी काम केले आहे. आता तर त्यांना थेट विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय हिच्या सौंदर्यावर मेकअप चढविण्याची संधी मिळाली आहे. ‘सरबजीत’च्या पोस्टरमध्ये ऐश्वर्याचा लुक पाहूनच सुभाषने केलेली मेहनत दिसून येतेय.