रामचंद्र पुरुषोत्तम मराठे यांची आज जयंती
By Admin | Updated: October 23, 2016 10:30 IST2016-10-23T10:30:13+5:302016-10-23T10:30:48+5:30
ज्येष्ठ मराठी संगीतकार, गायक आणि नट रामचंद्र पुरुषोत्तम मराठे उर्फ राम मराठे यांची आज जयंती

रामचंद्र पुरुषोत्तम मराठे यांची आज जयंती
-प्रफुल्ल गायकवाड
पुणे, दि. 23 - ज्येष्ठ मराठी संगीतकार, गायक आणि नट रामचंद्र पुरुषोत्तम मराठे उर्फ राम मराठे यांची आज जयंती, 23 ऑक्टोबर 1924ला त्यांचा पुण्यात जन्म झाला. राम मराठे यांनी पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतबुवा मिराशी, मास्तर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खाँ आणि पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.
पंडित गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. अल्पावधीतच त्यांनी मराठी संगीतकार, गायक म्हणून नावलौकिक मिळवला. 4 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या कन्या सुशीला ओक व नात पल्लवी पोटे या त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. राम मराठे यांची मदनाची मंजिरी, मंदारमाला, मेघमल्हार ही नाटके गाजली. पंडित राम मराठे यांच्या काहे अब तुम आये हो (राग सोहोनी) , जपत जपत गुरु नामजियरा रे (राग सोहोनी), बालम तर गैया (राग भीमपलास), बिरज में धूम या बंदिशी खूप प्रसिद्ध झाल्या.
मोघुबाई कुर्डीकर यांनी राम मराठ्यांना यांना जोड आणि अनवट रागांचा बादशहा म्हणून गौरवले. राम मराठ्यांना महाराष्ट्र शासनाने 'संगीतभूषण' किताबाने गौरविले. १९८७ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला.
सौजन्य : मराठी विकिपीडिया