तनिष्ठा चॅटर्जी डॉ. रखमाबार्इंच्या भूमिकेत
By Admin | Updated: October 8, 2016 01:32 IST2016-10-08T01:32:35+5:302016-10-08T01:32:35+5:30
बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण करण्यास सज्ज झाली

तनिष्ठा चॅटर्जी डॉ. रखमाबार्इंच्या भूमिकेत
बॉलीवूडबरोबरच हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘डॉ. रखमाबाई’ सिनेमाच्या माध्यमातून तनिष्ठा चॅटर्जी रसिकांच्या भेटीला येणार आहे. पहिली स्त्री वैद्य डॉ. रखमाबाई यांची भूमिका तनिष्ठा रुपेरी पडद्यावर साकारणार असून, डॉ. रखमाबाई यांचा जीवनप्रवास या सिनेमातून उलगडण्यात येईल. अनंत महादेवन सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून,
डॉ. स्वप्ना पाटकर सिनेमाची निर्मिती करणार आहेत. आजही स्त्रियांना भोगाव्या लागणाऱ्या यातना, बालविवाह यांसारख्या विविध प्रश्नांवर या सिनेमातून भाष्य करण्यात येणार आहे.