टायगरची लाँग जम्प
By Admin | Updated: December 14, 2014 00:27 IST2014-12-14T00:27:16+5:302014-12-14T00:27:16+5:30
‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा:या टायगर श्रॉफने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

टायगरची लाँग जम्प
‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा:या टायगर श्रॉफने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या लुक्सबाबत अनेक विनोद केले जात असले, तरी त्याच्या टॅलेंटवरून तरी तो बॉलीवूडमध्ये मोठी इनिंग खेळण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. टायगर करण जोहरच्या ‘21 जम्प स्ट्रीट’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. सूत्रंनुसार करण त्याच्या या चित्रपटाचे शुटिंग 2क्15 मध्ये सुरू करणार असून या चित्रपटात टायगरला मुख्य भूमिकेत घेण्याची त्याची इच्छा आहे. 2क्14 मध्ये आलेल्या सर्व नवोदितांपैकी टायगर जास्त प्रतिभावंत असल्याचे करणचे मत आहे. 21 जम्प स्ट्रीट 2क्12 मध्ये रिलीज झालेला अमेरिकन अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटाचा दुसरा भाग 22 जम्प स्ट्रीटही प्रेक्षकांना आवडला. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 23 जम्प स्ट्रीट लवकरच बनवण्यात येणार आहे. याच अमेरिकन चित्रपटाचा रिमेक करण बनवणार आहे.