टायगर करणार कॉमेडी!
By Admin | Updated: November 14, 2015 02:30 IST2015-11-14T02:30:53+5:302015-11-14T02:30:53+5:30
‘हिरोपंती’ पासून करिअरला सुरुवात के लेला जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ हळूहळू त्याचा वेग पकडत आहे. त्याच्याकडे ‘फ्लाइंग जट’ आणि ‘बागी’सारखे बिग बजेट चित्रपट आहेत.

टायगर करणार कॉमेडी!
‘हिरोपंती’ पासून करिअरला सुरुवात के लेला जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ हळूहळू त्याचा वेग पकडत आहे. त्याच्याकडे ‘फ्लाइंग जट’ आणि ‘बागी’सारखे बिग बजेट चित्रपट आहेत. तसेच कोरिओग्राफर अहमद खान यांच्या आगामी कॉमेडी चित्रपटासाठी त्याने साइन केले आहे. याविषयी खान म्हणाले, की निर्माता साजिद नाडियाडवालासोबत एक हलकीफुलकी कॉमेडी चित्रपट करीत आहोत. यासाठी आम्ही टायगरला अगोदरच घेतले आहे. लेखक युनूस साजावाल यावर काम करीत आहेत. १९९७ मध्ये रिलीज झालेला सलमान खानचा ‘जुडवाँ’ चित्रपटाचा हा सिक्वल असल्याच्या चर्चेचे अहमद यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले, की हे खरे नाही. या फक्त शक्यता आहेत.