ब्लॅकमध्ये कबालीच्या एक तिकीटाचा दर ५ हजार

By Admin | Updated: July 22, 2016 16:48 IST2016-07-22T16:38:58+5:302016-07-22T16:48:38+5:30

आज सकाळी चेन्नईमध्ये चार वाजताच्या पहिल्या खेळाचे तिकीट मिळवण्यासाठी लोकांनी रात्रभर रांग लावली होती.

A ticket for a Kabbali ticket in Black is 5 thousand | ब्लॅकमध्ये कबालीच्या एक तिकीटाचा दर ५ हजार

ब्लॅकमध्ये कबालीच्या एक तिकीटाचा दर ५ हजार

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. २२ - सुपरस्टार रजनीकांतच्या कबाली सिनेमाची तामिळनाडूमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आज सकाळी चेन्नईमध्ये चार वाजताच्या पहिल्या खेळाचे तिकीट मिळवण्यासाठी लोकांनी रात्रभर रांग लावली होती. कर्मचारी कामावर येण्याची आशा सोडून दिलेल्या चेन्नईतील अनेक कंपन्यांनी सुट्टीही जाहीर केली होती. 
 
कबालीच्या सर्व शो च्या तिकीटांची आधीच विक्री झाल्याने ब्लॅकमध्ये अव्वाच्या सव्वा दरामध्ये ही तिकीटे विकली जात आहेत. ब्लॅकमध्ये कबालीचे एक तिकीट पाच हजार रुपयांना विकले जात आहे. तामिळनाडूमध्ये रजनीकांतला देवाचा दर्जा आहे. 

आणखी वाचा 
'कबाली'बद्दल या १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
REVIEW: कबाली - इमोशनच्या नादात अडकलेला अॅक्शन सिनेमा
 
रजनीकांतचा चित्रपट उत्सवासारखा साजरा करण्यासाठी फॅन्सनी रजनीसारखी हेअरस्टाईल केली  आहे. काहींनी रजनीचा टॅटू हातावर गोंदवून घेतला आहे. काहींनी फटाके फोडून, मिठाई वाटून रजनीच्या कबाली प्रदर्शनाचा आनंद साजरा केला. 

Web Title: A ticket for a Kabbali ticket in Black is 5 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.