"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 22:02 IST2025-11-26T22:00:06+5:302025-11-26T22:02:12+5:30

सेलिनाने पतीचे टॉर्चर करणे हनीमूनपासूनच सुरू झाले होते, असे म्हटले आहे. दिल्ली गँगरेपनंतर, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकेन, असे म्हणत हॉगने सेलिनाला धमकावणे सुरू केले होते.

Threatening to insert a rod into her private parts blackmailing her with nude photos Celina Jaitley 7 serious allegations against husband peter haag | "प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप

"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप

अभिनेत्री सेलिना जेटलीच्या घटस्फोटासंदर्भातील वत्ताने सर्वांना धक्का बसला आहे. सेलिनाने पती पीटर हॉगवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केरत मुंबईतील एका न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. पीटर हॉग मुळचा ऑस्ट्रियन आहे. सेलिनाने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार, शारिरीक, मानसिक छळ आदी गंभीर आरोप केले आहेत. 

लाइव्ह हिंदुस्तानने कोर्ट डॉक्यूमेंट्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सेलिनाने पतीचे टॉर्चर करणे हनीमूनपासूनच सुरू झाले होते, असे म्हटले आहे. दिल्ली गँगरेपनंतर, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकेन, असे म्हणत हॉगने सेलिनाला धमकावणे सुरू केले होते. एवढेच नाही तर, तो तिच्यावर इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबावही टाकत होता. याशिवाय तिला न्यूड फोटोज घेऊन ब्लॅकमेलही करत होता.

महागड्या भेटवस्तूंची मागणी - 
अभिनेत्री सेलिना जेटलीने तिचा पती पीटर हॉगविरोधात केलेले आरोप अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहेत. सेलिनाने पीटरला 'आत्ममुग्ध, दारुडा आणि क्रोधी' व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. तिच्या तक्रारीनुसार, पीटरने लग्नात महागड्या भेटवस्तूंची मागणी केली होती, ज्यात ६ लाख रुपयांचे डिझायनर कफलिंक्स आणि १० लाख रुपयांची ज्वेलरी तिच्या कुटुंबीयांनी दिली होती.

हनीमूनवर मासिक पाळीवरून वाद: 
सेलिनाने आरोप केला आहे की, इटलीमध्ये हनीमूनदरम्यान तिला मासिक पाळीचा त्रास होऊ लागला. तेव्हा ती पीटरला डॉक्टरांकडे जाण्यासंदर्भात बोलली, तेव्हा पीटर तिच्यावर प्रचंड चिडला, आरडा-ओरड केली आणि रागाच्या भरात दारूचा ग्लास भिंतीवर फेकून मारला.

डिलीवरीनंतर घरातून हाकलले -
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर, सेलिनाने टाके निघेपर्यंत मुलांकडे लक्ष देण्यात मदत व्हावी म्हणून पीटरला पॅटर्निटी लिव्ह घेण्याची विनंती केली. यावर त्याने तिला मदत करण्याऐवजी तिची मनगट पकडली आणि “माझ्या आयुष्यातून चालती हो,” असे म्हणत अपार्टमेंटमधून बाहेर काढले. तेव्हा एका शेजाऱ्याने तिला मदत केली.

'निर्भया' घटनेनंतरची धमकी:
२०१२ च्या दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीटरने सेलिनाला लैंगिक त्रास दिला. भांडण झाल्यावर पीटर तिला वारंवार 'तुझ्या यो***मध्ये रॉड टाकेन' अशी धमकी देत होता आणि 'तू याच लायकीची आहेस' असे म्हणायचा, यामुळे सेलिना खूप घाबरली होती.

इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव: 
लीगल डॉक्युमेंट्सनुसार, पीटरने तिला 'केवळ लैंगिक वस्तू' बनवले होते. त्याने २०१४-२०१५ दरम्यान, स्वतःच्या प्रगतीसाठी तिच्यावर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधील एका सदस्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास दबावही टाकला होता.

करत होता अनैसर्गिक लैंगिक संबंधांची मागणी - 
पीटर सेलिनाला आपल्या वरच्या रूममध्ये बोलावून अनैसर्गिक लैंगिक संबंध (Anal Sex) करण्याची जबरदस्ती करायचा, असेही सेलिनाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

न्यूड फोटो अन् ब्लॅकमेलिंग  
सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे, पीटरने सेलिनाचे न्यूड फोटो घेतले आणि आपल्या लैंगिक मागण्या पूर्ण न केल्यास ते माध्यमांत लीक करेन, असे म्हणत ब्लॅकमेल केले. 
 

Web Title : सेलिना जेटली का पति पर बलात्कार की धमकी, ब्लैकमेलिंग, उत्पीड़न का आरोप

Web Summary : सेलिना जेटली ने अपने पति पीटर हॉग पर बलात्कार की धमकी, शारीरिक और मानसिक शोषण, दहेज की मांग और दूसरों के साथ यौन संबंध बनाने के लिए मजबूर करने का आरोप लगाया। उन्होंने न्यूड तस्वीरों से ब्लैकमेल करने और अप्राकृतिक यौन संबंध का भी आरोप लगाया।

Web Title : Celina Jaitly Accuses Husband of Rape Threats, Blackmail, and Abuse

Web Summary : Celina Jaitly accuses her husband, Peter Haag, of marital rape threats, physical and mental abuse, demanding dowry, and forcing her to have sex with others. She alleges blackmail using nude photos and unnatural sex.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.