स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 15:49 IST2025-05-12T15:45:47+5:302025-05-12T15:49:58+5:30

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर प्रतीकला लहानाचं मोठं त्याच्या आजी-आजोबांनी केलं. मात्र, त्यावेळी बॉलिवूडची अतिशय प्रसिद्ध जोडी प्रतीकला दत्तक घ्यायला तयार होती.

This famous Bollywood couple was going to adopt Prateik Babbar after Smita Patil s death! The actor's big revelation | स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 

स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर हा  स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा आहे. स्मिता पाटील यांच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले तेव्हा, राज बब्बर आधीच विवाहित होते. मात्र, स्मिता पाटील यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी नादिरा यांना घटस्फोट दिला. स्मिता आणि राज यांच्या संसाराची सुरुवात तर झाली, पण तो फार काळ चालला नाही. १९८६मध्ये मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर स्मिता यांचे निधन झाले. आईच्या निधनानंतर प्रतीकला लहानाचं मोठं त्याच्या आजी-आजोबांनी केलं. मात्र, त्यावेळी बॉलिवूडची अतिशय प्रसिद्ध जोडी प्रतीकला दत्तक घ्यायला तयार होती. याचा खुलासा स्वतः प्रतीक बब्बरने केला आहे. 



कोण होती ही जोडी?
अभिनेता प्रतीक बब्बर याने नुकतीच झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी प्रतीक म्हणाला की, "मला काही दिवसांपूर्वीच हे कळलं की, आईच्या निधनानंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी मला दत्तक घेणार होते. पण, ती प्रक्रिया थोडी कठीण होती. नाहीतर आज मी फरहान अख्तरचा सावत्र भाऊ असलो असतो. मला स्वतःबद्दल रोज नवनव्या गोष्टी कळत आहेत. पण आता त्यावर कायच बोलणार... पण जर असं घडलं असतं तर, माझं आयुष्य काहीतरी वेगळंच असतं."     

प्रतीक म्हणाला ,"मला माझ्या बालपणाबद्दल अनेक गोष्टी आता कळत आहेत. माझा ताबा मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. मी खूप लहान होतो, फक्त रडायचो, माहीत नव्हतं माझ्यासोबत काय घडत होतं. मला दत्तक घेण्यासाठी लोक तयार होते. माझ्या आईला इंडस्ट्री आणि तिच्या मित्रपरिवाराकडून भरपूर प्रेम मिळालं. शबानाजी आणि जावेद साहेब त्यांपैकीच एक होते."   

Web Title: This famous Bollywood couple was going to adopt Prateik Babbar after Smita Patil s death! The actor's big revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.