या खेळाडूंनी आजमावले अभिनयात नशीब...

By Admin | Updated: May 13, 2016 12:43 IST2016-05-13T12:43:19+5:302016-05-13T12:43:47+5:30

सुनील गावस्करपासून ब्रेट ली, सलील अंकोला ते सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक खेळाडूंनी अभिनयात नशीब आजमावले आहेत.

These players have tried their best luck ... | या खेळाडूंनी आजमावले अभिनयात नशीब...

या खेळाडूंनी आजमावले अभिनयात नशीब...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ -  कठोर मेहनतीच्या आधारे क्रीडा क्षेत्रात चमकून यश मिळवणारे खेळाडू सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. यापैकी अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आले आणि त्यांनी भरपूर गल्लाही कमावला. मेरी कोम, भाग मिल्खा भाग असे किंवा आज प्रदर्शित झालेला अझर, पुढील काळात येणारे एम.एस. धोनी हे चित्रट ... त्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या आपल्या लाडक्या सचिनच्या जीवनावरही चित्रपट येत असून खुद्द सचिनच त्यात प्रमुख भूमिका करणार आहे. सचिन व्यतिरिक्त इतर अनेक खेळाडूंनीही अभिनयात नशीब आजमावले आहे. अशाच काही खेळाडूंबद्दल आपण आज जाणून घेऊया...
 
सुनील गावस्कर : लिटिल मास्टर या नावाने ओळखले जाणारे महान भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांनी प्रेमाची सावली या मराठी चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले होते. तसेच नसिरूद्दीन शाह यांच्या मालामाल चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. 
 
युवराज सिंग : भारताचा दमदार व स्टार फलंदाज असलेल्या युवराज सिंगने क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी लहानपणी बालकलाकार म्हणून अनेक पंजाबी चित्रपटात काम केले होते. 
 
 
ब्रेट ली : ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज ब्रेट लीने हा फक्त अभिनेताच नव्हे तर चांगला गायक व गिटार प्लेयरही आहे. २००८ साली आलेल्या व्हिक्टरी चित्रपटात त्याने भूमिका केली होती. एवढेच नव्हे तर प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्यासोबत एका अल्बममध्ये गाणे गातानाही झळकला आहे. 
 
 
कपिल देव - ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव हे मुझसे शादी करोगे व स्टम्प्ड चित्रपटात दिसले होते.
 
अजय जाडेजा : भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू असलेल्या अजय जाडेजाचे नाव फिक्सिंग प्रकरणात आल्याने त्याचे क्रिकेट करीअर संपुष्टात आले. त्यानंतर त्याने चित्रपटात नशीब आजमावले. २००३ साली आलेल्या खेल चित्रपटात त्याने महत्वाची भूमिका केली होती.
 
 
 
सलिल अंकोला - प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सलिल अंकोलाने त्याच्या देखण्या व्यक्तिमत्वामुळे अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले. अभिनेत्री रेणुका शहाणेसोबतची कोरा कागज ही सलिलची मालिका खूप गाजली होती. 
 
विनोद कांबळी - शालेय स्पर्धेदरम्यान सचिनसोबत केलेल्या ६६४ धावांच्या भागीदारीमुळे त्याकाळी क्रिकेट जगतात गाजलेला विनोद कांबळी खेळातील सातत्याच्या अभावी क्रिकेट करीअरमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यानंतर त्याने अभिनयाकडे आपला मोहरा वळवला, मात्र तिथेही त्याच्या पदरी अपयशच आले. २००२ साली आलेल्या अनर्थ चित्रपटात संजय दत्त व सुनील शेट्टी सोबत तर आणखी एका चित्रपटात तो क्रिकेट सहकारी अजय जाडेजा व सतीश शहा यांच्यासोबत झळकला. 
 
 
लिएँडर पेस : भारताचा स्टार टेनिसपटू लिएँडर पेसनेही चित्रपटात काम केले आहे. ऐकून आश्चर्य वाटले ना? पण हे खरं आहे... अशोक कोहली यांच्या राजधानी एक्स्प्रेस चित्रपटात लिएँडरने अभिनय केला होता. हा चित्रपट तिकीटबारीवर फारसा यशस्वी ठरला नसला तरी चित्रपटातील लिएँडरच्या भूमिकेचे कौतुक झाले.
 
 
 
२००४ साली आलेल्या मुझसे शादी करोगे या चित्रपटात इरफान पठाण, हरभजन सिंग, पार्थिव पटेल, आशिष नेहरा व मोहम्मद कैफ हे क्रिकटपटूही काही काळासाठी झळकले होते. 

 

Web Title: These players have tried their best luck ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.