'हे' आहेत 'रात्रीस खेळ चाले'मधील खुनी!

By Admin | Updated: October 6, 2016 11:24 IST2016-10-06T09:02:37+5:302016-10-06T11:24:21+5:30

बहुचर्चित व लोकप्रिय 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील गूढ गोष्टींची उकल होत असून अजय व नेने वकीलांचे खरे खुनी सापडले आहेत.

'These are' night killers in the game! | 'हे' आहेत 'रात्रीस खेळ चाले'मधील खुनी!

'हे' आहेत 'रात्रीस खेळ चाले'मधील खुनी!

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ -  नेहमीपेक्षा वेगळया कथानकामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य करणारी  ' रात्रीस खेळ चाले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, याची माहिती  आम्ही तुम्हाला नुकतीच दिली होती. मात्र या मालिकेतील गूढ नेमके काय, खुनी कोण? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना अद्यापही मिळाली नसून मालिकेता शेवट नेमका कसा होणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे. नेने वकील आणि अजय यांचा खरा खुनी कोण याबाबतची उत्सुकता ताणली गेली असून शेवटच्या भागापर्यंत हे गुपित दडवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केला. मात्र मालिकेचे रहस्य आता उलगडले असून ख-या खुन्याचा शोधही लागला आहे. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानची काही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्या छायाचित्रांत पोलीस माधवाची बायको निलीमा व सुषमा उर्फ सुशल्या या दोघींच्या हातात बेड्या घालून नेताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघीच अजय व नेने वकील यांच्या खुनी असल्याचे दिसत आहे. निलीमा व सुषमाने त्या दोघांचा  का खून केला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून येत्या काही भागांतच प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नांचीही उकल होईल असे दिसते.
( 'रात्रीस खेळ चाले'मध्ये ट्विस्ट? नव्या पाहुण्याचे आगमन)
(लवकरच उलगडणार ' रात्री'चे रहस्य, मालिका घेणार निरोप!)
 
 

Web Title: 'These are' night killers in the game!