रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षणाची प्रक्रिया लवकरच आॅनलाइन - अरुण नलावडे
By Admin | Updated: November 3, 2015 01:31 IST2015-11-03T01:31:44+5:302015-11-03T01:31:44+5:30
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळामार्फत परिनिरीक्षणाची प्रक्रिया लवकरच आॅनलाइन करण्यात येणार असल्याची माहिती रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षणाची प्रक्रिया लवकरच आॅनलाइन - अरुण नलावडे
मुंबई : रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळामार्फत परिनिरीक्षणाची प्रक्रिया लवकरच आॅनलाइन करण्यात येणार असल्याची माहिती रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी दिली. रवींद्र नाट्यमंदिर येथे पु.ल. देशपांडे कला अकादमीत सोमवारी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सहाव्या बैठकीत
अरुण नलावडे यांनी ही माहिती दिली. यावेळी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, मंडळामार्फत परिनिरीक्षण आॅनलाइन करण्याची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. आॅनलाइन प्रक्रियेमुळे वेळ आणि शक्ती वाचण्याबरोबरच तत्काळ प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार आहे. बैठकीत सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या एकांकिका व नाटकांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण
मंडळाची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली असून बैठकीत १२ नवीन सदस्यांचा परिचय करून देण्यात आला.
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ प्राप्त झालेल्या संहितांचे पूर्वपरीक्षण करून योग्यता प्रमाणपत्र देण्याचे काम करीत असते. मंडळामार्फत दर महिन्याला एक बैठक घेण्यात येते.
बैठकीत मागील बैठकीतले इतिवृत्त अंतिम करणे, मंडळाच्या पुढील बैठकीचे आयोजन, स्थळ ठरविणे यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. सलग तीन बैठकींना गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना अध्यक्षांमार्फत अनुपस्थितीबाबत विचारणा करण्यात यावी, असे मतही उपस्थित सदस्यांनी बैठकीत मांडले. (प्रतिनिधी)