तेरा साया साथ होगा... मदनमोहन यांना श्रद्धांजली!

By Admin | Updated: July 14, 2016 12:26 IST2016-07-14T11:51:24+5:302016-07-14T12:26:11+5:30

आप की नजरोंने समझा, लग जा गले, तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा अशी गाणी देणारे मा.मदनमोहन यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली...

Tera saya will be together ... tribute to Madan Mohan! | तेरा साया साथ होगा... मदनमोहन यांना श्रद्धांजली!

तेरा साया साथ होगा... मदनमोहन यांना श्रद्धांजली!

>- संजीव वेलणकर
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १४ -  ' आप की नजरोंने समजा प्यार के काबिल मुझे', 'लग जा गले', 'तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा', 'रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे ' अशी एकाहून एक सरस गाणी देऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार मा. मदनमोहन यांची आज (१४ जुलै) पुण्यतिथी.  २५ जून १९२४ रोजी जन्म झालेल्या मदनमोहन यांच्या संगीतात मधुरता व भाव-भावना॑चा उत्कृष्ट परिपोष प्रकर्षाने जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्याचे हक्काचे किल्लेच होते. हि॑दी, उर्दूवर त्यांचे उत्तम प्रभुत्व होते. 
मदनमोहन यांची प्रतिभा ‘गीतधर्मी’ होती. याचाच वेगळा अर्थ असा लावता येईल की शब्दांच्या अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे विविध तरंग निर्माण करण्याची ताकद, त्यांच्या संगीत रचनेतून प्रतीत होत होती. यामध्ये, कवितेतील आशयाबरोबर सांगीतिक रचनादेखील समांतर अस्तित्व दाखवत असते. तरीही दोन्ही घटकांचा अत्यंत सुनियोजित मेळ घातलेला असतो. यावरूनच, मदनमोहन यांच्या संगीतात गझलेला का महत्त्व आले, हे अधोरेखित व्हावे. गीतधर्मी संगीतकार हे नेहमीच लयबंधापेक्षा सुरावटीकडे आणि त्याच्या प्रवाही चलनाकडे अधिक झुकतात. लयबंधाच्या किंवा तालांच्या ठळक वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते, तिच्यापेक्षा स्वररंगातील सूक्ष्म भेद दाखवून आकारास येणारी गतिमानता, असे संगीतकार नेहमी पसंत करतात.
भिन्न प्रकृतीची गाणी अगदी लीलया देणं हा मदनमोहन यांचा स्वभाव होता. एका सिनेमातच नव्हेतर एकाच गाण्याच्या प्रत्येक कडव्यात ते कित्येकदावेगवेगळ्या रागदारीचे, वेगवेगळ्या मूडचे प्रयोगकरीत असत. इक हसीन शाम को (दुल्हन एक रातकी), बेताब दिल की तमन्ना (हसते जख्म), कोई पत्थर से ना मारे (लैला-मजनू) अशी अनेक गाणी दाखला म्हणून देता येतील. ‘हसते जख्म'मधील ‘तुमजो मिल गये हो' या गाण्यात स्क्रिप्टच्या मागणीनुसारप्रत्येक कडव्यात एवढे वेगवेगळे मूड्स वापरले होतेकी, ते त्या काळात मदनमोहन यांच्या दर्दी चाहत्यांनासुद्धा फारसे आवडले नव्हते, पण आजही त्यांची लोकप्रियता एवढी टिकून आहे की, जेव्हा अलीकडे कोकाकोलाच्या अॅाडमध्ये वापरल्या गेलं तेव्हा तरुणपिढीला त्यांच्यात आजच्या युगाचीच झिग आढळली.चित्रपटातला गाण्याचा कोणताच प्रकार मदनमोहन म्हणून यांनी वज्र्य मानला नाही. मा.मदनमोहन यांच्या गाण्याचे मुखडे कायम गुणगुणत राहावे, असे होते. उत्स्फूर्त वाटणार्याा संगीतात वाक्यासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असत. त्यामुळे त्यांच्या गाण्यात ‘गायकी’ अंग फार ठळकपणे दिसून येत असे. कारकीर्दीच्या सुरुवातीला ‘हमारे बाद अब महफ़िल में’, किंवा ‘दुखियारे नैना’सारखी विलक्षण ताकदीची गाणी देणारे मदनमोहन, अगदी आयुष्याच्या अखेरीस ‘बैया ना धरो’ किंवा ‘आज सोचा तो आंसू भर आये’ अशी त्याच तोलामोलाची गाणी देऊ शकले. 
मदनमोहन यांच्या बरोबर राजेन्द्रकृष्ण, राजा मेहन्दी अली खान, साहिर लुधियानवी, नक्ष लायलपुरी, मजरूह सुलतानपुरी तसेच कैफी आझमी॑सारख्या थोर गीतकारा॑नी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. मदन मोहन यांची घायाळ करणारी धून व उपरोक्त गीतकारा॑चे हृदयावर वार करणारे शब्द असा तो अजोड संगम होता. प्रभाकर जोग, उत्तम सि॑ग ह्यासारखे अव्वल दर्जाचे व्हायोलिन वादक तर मनोहारी सि॑गसारखे उत्कृष्ट सॅक्सोफोन वादक या॑च्याशिवाय मदनमोहन यांचे पान हलत नसे.
 
'रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे ' ......
'आपकी नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे ...'
या अश्या बहारदार गीतांना स्वतःचा संगीतमय स्पर्श करून मदन मोहन यांनी ती गाणी अमर केली. या गाण्याचे संगीत म्हणजे संमोहनच जणू …. एक दोन नाही अनेक सदाबहार गीते देऊन करून आजही ते नेहेमीसाठी संगीत रूपाने वावरत असतात….
'तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा' असू दे नाहीतर 'लग जा गले' …. 'नैनों में बदरा छाये' …. 'अगर मुझसे मोहोब्बत है' … 'यूँ हसरतों के दाग' किंवा मग स्वतःच्या तालावर आपल्यालाही ठुमकायला लावणारे 'झुमका गिरा रे ' असू दे 'मदनमोहन' या सर्व गीतांमधून संगीतमय दुनियेत व आपल्यात आजही भिनलेले आहेत. मदनमोहन व किशोरकुमार यांची खास दोस्ती होती. मदनमोहन यांच्यासाठी अनेक हिट गाणी किशोरकुमार यांनी गायली होती. देव आनंद यांच्याच्या ‘साहिब बहादूर'साठी किशोरकुमारच्या आवाजात खास देव आनंद स्टाईल गाणं मदनमोहन यांना रेकॉर्ड करायचं होतं. ‘राही था मै आवारा' हे ते गाणं. किशोरकुमारला मात्र व्यस्ततेमुळे रिहर्सलसाठी वेळ मिळेना. अनेक दिवस वाट पाहून मदनमोहन यांनी गाणं स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड करून टेप किशोरकुमारकडे पाठवून दिली. किशोरच्या व्यस्ततेमुळे चिडलेल्या मदनमोहन यांनी गाण्याच्या शेवटी एक छोटासा संदेशही रेकॉर्ड केला, ‘ए बंगाली, मेरा गाना ध्यान से सुन, और अच्छेसे रिहर्सल करके आना, और खराब नही करना.' मध्ये बराच काळ उलटला. किशोरकुमारच्या सोयीनुसार रेकॉर्डिंग ठरलं. रिहर्सलसाठी किशोर कुमार यांनी ही टेप ऐकली आणि शेवटी असलेला संदेश ऐकून त्याचे डोळे पाण्याने भरून आले, कारण पंधरा दिवसांपूर्वीच मदनमोहन यांचा अकाली मृत्यू झाला होता. 
मा.मदनमोहन यांचे १४ जुलै १९७५ रोजी निधन झाले. लोकमत समूहातर्फे मा. मदनमोहन यांना आदरांजली. 
 

Web Title: Tera saya will be together ... tribute to Madan Mohan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.