झूमा भाभी बनून बिग बॉसची ‘ही’ स्पर्धक लावणार हॉटनेसचा तडका, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 15:32 IST2018-04-11T10:02:20+5:302018-04-11T15:32:45+5:30
बिग बॉसच्या सीजन १० मध्ये बघावयास मिळालेली ही हॉट स्पर्धक आता झूमा भाभी बनून हॉटनेसचा तडका लावताना दिसणार आहे. तिच्या या शोचा टीजर समोर आला असून, त्यात ती खूपच हॉट दिसत आहे.
.jpg)
झूमा भाभी बनून बिग बॉसची ‘ही’ स्पर्धक लावणार हॉटनेसचा तडका, पाहा व्हिडीओ!
भ जपुरी अभिनेत्री आणि बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या सीजन-१० मध्ये झळकलेली मोनालिसा आता आपल्या हॉट अंदाजात कमबॅक करण्यास तयार आहे. होय, मोनालिसा लवकरच कमबॅक करणार असून, तेही भाभीच्या रूपात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. मोनालिसा बंगाली वेब सीरिज ‘दुपुर ठाकुरपो’मध्ये झळकणार आहे. हा या सीरिजचा दुसरा सीजन आहे. या सीरिजमध्ये ती झूमा भाभीची भूमिका साकारणार आहे. ही सीरिज डिजिटल प्लॅटफॉर्म होईचोईवर बघता येईल. मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सीरिजचा टीजर शेअर केला आहे. तसेच हादेखील इशारा दिला आहे की, ती या सीरिजमध्ये अतिशय हॉट अंदाजात बघावयास मिळणार आहे.
‘दुपुर ठाकुरपो-२’मध्ये काही तरुण दाखविण्यात येतील जे झूमा भाभीच्या प्रेमात पडत असतात. ते सातत्याने झूमा भाभीला फॉलो करीत असतात. दरम्यान, मोनालिसाने या शोच्या टीजरबरोबरच शोमधील तिचे बरेचसे फोटोही इन्स्टाग्रामवर अपलोड केले. या सर्व फोटोमध्ये मोनालिसा जबरदस्त दिसत आहे. शिवाय ती या शोमध्ये हॉटनेसचा तडका लावताना दिसेल याचे संकेतही तिने दिले.
मोनालिसाचे खरे नाव अंतरा बिश्वास आहे. तिने आतापर्यंत १२५ पेक्षा अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु बिग बॉसच्या सीजन १० मुळे तिच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. कारण या शोमधूनच तिला तुफान लोकप्रियता मिळाली आहे. मोनालिसाने शोच्या दरम्यान तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूतसोबत लग्न केले होते. विक्रांतही भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करतो. आता हे बघणे औत्सुक्याचे ठरेल की, ‘झूमा भाभी’ प्रेक्षकांचे मन जिंकण्यात कितपत यशस्वी ठरेल.