माझ्या नवऱ्याची बायको घेणार प्रेक्षकांचा निरोप... असा असणार शेवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 12:40 IST2019-04-01T12:31:40+5:302019-04-01T12:40:05+5:30

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावरील सगळ्यात प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या नेहमीच पसंतीस पात्र ठरतात.

Zee marathi's Mazhya navryachi Bayko will end soon | माझ्या नवऱ्याची बायको घेणार प्रेक्षकांचा निरोप... असा असणार शेवट

माझ्या नवऱ्याची बायको घेणार प्रेक्षकांचा निरोप... असा असणार शेवट

ठळक मुद्देगुरुनाथला आपली चूक कळल्यामुळे तो राधिकाची माफी मागणार आहे आणि राधिका देखील मोठ्या मनाने त्याला माफ करून ते दोघे नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.माझ्या नवऱ्याची बायको ही प्रेक्षकांची सगळ्यात आवडती मालिका असल्याने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण असे काहीही नाहीये. आज April Fool च्या निमित्ताने थोडीशी गंमत केली.

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या मालिकेत गुरुनाथ आणि राधिका यांच्या नात्यातील कटूता कमी होणार असून शनाया त्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. गुरुनाथला आपली चूक कळल्यामुळे तो राधिकाची माफी मागणार आहे आणि राधिका देखील मोठ्या मनाने त्याला माफ करून ते दोघे नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावरील सगळ्यात प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या नेहमीच पसंतीस पात्र ठरतात. गुरुनाथ, शनाया, राधिका यांच्यातील जुगलबंदी रसिकांना भावते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. शनायाची भूमिका रसिका सुनील साकारत होती. शनाया ही व्यक्तिरेखा या मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनीलने या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले होते. मात्र या मालिकेतून तिने काही महिन्यांपूर्वी एक्झिट घेतली. या मालिकेत आता शनायाची भूमिका इशा केसकर साकारत आहे. प्रेक्षक या नव्या शनायाला देखील तितकीच पसंती देत आहेत.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने आजवर टीआरपीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. गेल्या कित्येक आठवड्यांपासून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, स्वावलंबी राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी नखरेल शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला बिचारा गुरुनाथ या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. 


टीप : माझ्या नवऱ्याची बायको ही प्रेक्षकांची सगळ्यात आवडती मालिका असल्याने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण असे काहीही नाहीये. आज April Fool च्या निमित्ताने थोडीशी गंमत केली. तुमची ही आवडती मालिका यापुढेही तुमचे तितकेच जोमाने मनोरंजन करणार आहे. त्यामुळे आता तुम्हीही बनवा तुमच्या मित्रांना Fool!

Web Title: Zee marathi's Mazhya navryachi Bayko will end soon